शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

भूखंड वाटपात अनियमितता : हायकोर्टात नागपूर सुधार प्रंन्यासची कानउघाडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:42 IST

भूखंड वाटप अनियमिततेच्या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी नागपूर सुधार प्रन्यासची चांगलीच कानउघाडणी केली.

ठळक मुद्देठोस उत्तर सादर करण्याचे आदेश

आॅनलाईन लोकमतनागपूर : भूखंड वाटप अनियमिततेच्या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी नागपूर सुधार प्रन्यासची चांगलीच कानउघाडणी केली. याप्रकरणात नासुप्र प्रामाणिकपणे वागत नसल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. तसेच, याप्रकरणात आतापर्यंत कोणावर कारवाई केली अशी विचारणा करून यासंदर्भात दोन आठवड्यांत ठोस उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. उत्तरासाठी दिलेली ही अंतिम संधी असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले.यासंदर्भात न्यायालयामध्ये २००४ पासून जनहित याचिका प्रलंबित आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने नासुप्रच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. २००२ पूर्वी ८५ भूखंडांच्या वाटपात अनियमितता झाल्याचा आरोप आहे. परंतु, याप्रकरणात आतापर्यंत कोणावर कारवाई करण्यात आली याचे उत्तर नासुप्रने न्यायालयात सादर केले नाही. नासुप्र प्रामाणिकपणे सहकार्य करीत नाही असे ताशेरे न्यायालयाने ओढले. तसेच, प्रकरणातील न्यायालय मित्र अ‍ॅड. आनंद परचुरे यांनी नासुप्रचे आरोप फेटाळून लावले. आपण न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी नाही तर, न्यायालयाला सहकार्य करण्यासाठी येथे उभे आहोत असे अ‍ॅड. परचुरे यांनी सांगितले.न्यायालयाच्या आदेशानुसार सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम. एन. गिलानी हे नासुप्रमधील अनियमिततेची चौकशी करीत आहेत. त्यांना चौकशी पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे. गिलानी मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती आहेत. या चौकशीवर नासुप्रने आक्षेप घेतला आहे.कर्मचाऱ्यांच्या वेतनातून खर्चाची कपातयाआधी नवीनकुमार समितीने २००० पूर्वीच्या भूखंड वाटपाची चौकशी केली होती. असे असताना १७ वर्षांनंतरही काहीच ठोस हाती लागलेले नाही. या प्रकरणाच्या सुनावणीवर न्यायालयाचा वेळ व सार्वजनिक निधी खर्च होत आहे. त्यामुळे प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी विद्यमान नासुप्र कर्मचाऱ्याच्या वेतनातून काही रक्कम कपात केली जाऊ शकते काय, हा पैलू तपासून पाहणे आवश्यक आहे. परिणामी, राज्य शासन व नासुप्र सभापतींनी पुढच्या तारखेला यावरही स्पष्टीकरण द्यावे, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :Nagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यासHigh Courtउच्च न्यायालय