शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर महानगरपालिकेत एलईडीच्या कंत्राटात घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 10:23 IST

नागपूर महापालिकेने २०१४ मध्ये शहरातील विद्यमान पथदिवे बदलवून एलईडी पथदिवे लावण्याचा निर्णय घेतला होता. यात कोट्यवधींचा घोळ असल्याचा आरोप करून विरोधकांनी यावर सभागृहात चर्चेची मागणी केली आहे.

ठळक मुद्देनिविदांच्या तुलनेत ८० टक्के अधिक दरबाजारभावापेक्षा किंमत अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेने २०१४ मध्ये शहरातील विद्यमान पथदिवे बदलवून एलईडी पथदिवे लावण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या टप्प्यात १८ महिन्यात २७ हजारांचे उद्दिष्ट असताना जेमतेम ५३७ पथदिवे बदलविले. त्यामुळे जे.के. सोल्युशन इंक कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात आले. आता या कंपनीने महापलिकेकडे १७ कोटींची थकबाकी असल्याचा दावा केला आहे. डिसेंबर २०१६ मध्ये झोननिहाय एलईडी बसविण्याचे कंत्राट देण्यात आले. निविदातील शर्ती व अटीनुसार ७० ते ८० टक्के अधिक दराने नवीन कंत्राटदारांना काम देण्यात आले. यात कोट्यवधींचा घोळ असल्याचा आरोप करून विरोधकांनी यावर सभागृहात चर्चेची मागणी केली आहे.जानेवारी २०१७ नवीन कंत्राटदारांनी कामाला सुरुवात केली. मार्च २०१८ पर्यंत शहरातील प्रमुख रस्त्यांवर १ लाख २५ हजार एलईडी पथदिवे लावणे अपेक्षित होते. प्र्रत्यक्षात २३ हजार एलईडी दिवे लावण्यात आले. पथदिव्यांचे काम दोन टप्प्यात करावयाचे होते. पहिल्या टप्प्यात पथदिव्यांचे खांब व केबल बदलविण्यात येणार आहे. यावर ५०.०३ कोटी, तर दुसऱ्या टप्प्यातील पथदिवे बदलविण्यात येणार आहे. यावर १५८.९९ कोटींचा खर्च केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील निविदात शर्ती व अटीच्या तुलनेत ८० टक्के अधिक दराने तर दुसऱ्या टप्प्यात ७० टक्के अधिक दराने काम देण्यात आले आहे. यात गैरव्यवहार झाल्याचा विरोधकांचा आरोप असून काँग्रेसचे नगरसेवक संदीप सहारे यांनी याबाबतचा प्रश्न पुढील सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी दिला आहे.

बाजारभावाच्या तुलनेत दुप्पट दर

महापालिकेला दरवर्षी पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती तसेच वीज बिलावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. या खर्चासोबतच ऊर्जा बचत व्हावी, या हेतूने सोडियम दिव्याऐवजी एलईडी दिवे लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. बसविण्यात येत असलेल्या एका एलईडीचा खर्च ९ हजार ९०० रुपये आहे. मात्र याच दिव्याची खुल्या बाजारातील किंमत ३ हजार ६०० रुपये आहे. यात मोठ्याप्रमाणात अनियमितता झाल्याची शक्यता असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संदीप सहार यांनी केली आहे. यासंदर्भात गुरुवारी महापालिका आयुक्तांनाही निवेदन दिल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका