शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बडोद्यातील  साहित्य संमेलनातील निमंत्रितांना मानधन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 21:19 IST

यंदा बडोद्यात आयोजित करण्यात आलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होणाऱ्या निमंत्रकांना मानधन व प्रवासभत्ता देण्यात येणार नाही. इच्छुकांनीही स्वखर्चाने यावे, असे आवाहन संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केले.

ठळक मुद्देइच्छुकांनी स्वखर्चाने यावे : संमेलनाच्या आयोजकांचे पत्रपरिषदेत आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : यंदा बडोद्यात आयोजित करण्यात आलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होणाऱ्या निमंत्रकांना मानधन व प्रवासभत्ता देण्यात येणार नाही. इच्छुकांनीही स्वखर्चाने यावे, असे आवाहन संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केले. त्यांच्या आवाहनाला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनीही दुजोरा दिला. परंतु आयोजकांच्या या आवाहनाला साहित्य विश्वातून विविध प्रतिक्रिया उमटत असून, मानधन हा साहित्यिकांचा सन्मान आहे, आयोजक तो कसा नाकारू शकतात. क्षमता नसेल तर हा शिवधनुष्य हातात घेतला कशाला, असा प्रश्न साहित्य विश्वातून विचारला जात आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेत १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान बडोदा येथे होणार आहे. संमेलनात होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या संदर्भात महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी व दिलीप खोपकर यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली. स्वातंत्र्यपूर्व काळात बडोद्यातील संस्थानिकांनी मराठी भाषा व संस्कृती संवर्धनासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी भरपूर काम केले आहे. त्यामुळे संमेलनाच्या परिसराला ‘ महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी ’ असे नाव देण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन भारतीय ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त गुजराती लेखक रघुवीर चौधरी यांच्याहस्ते होणार आहे. त्याचबरोबर उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी, महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, गुजरातचे शिक्षणमंत्री चुडासमा उपस्थित राहणार आहे.संमेलनात एकाच परिसरातील विविध स्थळांवर चार परिसंवाद, कविसंमेलन, मान्यवरांचे काव्यवाचन, बोलीतील कविता, स्थानिकांचे बहुभाषिक संमेलन, प्रतिभावंतांचा सहवास, कथा-कथाकार, कथानुभव, टॉक-शो, या अभिनव कार्यक्रमांचे आयोजन मराठी भाषेचे वैभव व गौरवाचे दर्शन घडविणारा मराठी भाषा सुंदरी हा कार्यक्रम होणार आहे. ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, संगीत पहाट, शास्त्रीय गायन आदी कार्यक्रम होणार आहे. संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या कार्य-कर्तृत्वाचे सांगितिक दर्शन, बडोद्याच्या स्थानिक कलावंतांचा सहभाग असलेले बडोदा कला वैभव सोबतच कविकट्टा, प्रकाशन मंच, प्रकाशकांचा मेळावा होणार आहे. बडेजाव करण्यापेक्षा गुणात्मक संमेलनअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतलेल्या भूमिकेनुसार निमंत्रकांचे मानधन, प्रवासभत्ता यावरचा खर्च कमी केला आहे. संमेलनात फार असा बडेजाव केलेला नाही. संमेलन गुणात्मक कसे होईल, यावर आयोजकांचा भर आहे.

टॅग्स :Baroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलनnagpurनागपूर