शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

मिहानमधील गुंतवणुकीला ब्रेक

By admin | Updated: April 28, 2016 02:52 IST

जागतिक मंदीचा नागपुरातील मिहान प्रकल्पाच्या गुंतवणुकीवर परिणाम झाला आहे. मंदीमुळे प्रकल्प सुरू करणे ..

नऊ कंपन्यांचा जागा परत करण्याचा प्रस्ताव : एमएडीसीचा कंपन्यांना थांबविण्याचा प्रयत्ननागपूर : जागतिक मंदीचा नागपुरातील मिहान प्रकल्पाच्या गुंतवणुकीवर परिणाम झाला आहे. मंदीमुळे प्रकल्प सुरू करणे परवडत नसल्याचे कारण पुढे करून मिहानमधील नऊ कंपन्यांनी जागा परत करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावावर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) अद्याप कुठलाही निर्णय घेतला नसला तरीही एमएडीसीचे अधिकारी या कंपन्यांना थांबविण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकीकडे ‘मेक इन इंडिया’च्या नावाखाली राज्यात गुंतवणूक वाढल्याचा राज्य सरकार दावा करीत आहे, तर दुसरीकडे नागपूर जिल्ह्यातील मिहान प्रकल्पात ज्यांनी जागा विकत घेतली, त्या कंपन्यांही आता जागा परत करण्याच्या तयारीत आहेत.२३ कंपन्यांना शो कॉज नोटीसमिहानमधील प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी एमएडीसीचे अध्यक्ष व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री व मिहान टास्क फोर्सचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सचे सदस्य आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत २७ डिसेंबरला नागपुरात बैठक झाली होती. या बैठकीत कंपन्यांच्या दुर्लक्षितपणावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. ज्यांनी जागा विकत घेतली, पण उद्योग सुरू न केलेल्या कंपन्यांना शो कॉज नोटीस देण्याची शिफारस करण्यात आली. या निर्णयानुसार एमएडीसीने २३ कंपन्यांना ३ जानेवारी २०१६ ला नोटीस बजावली होती. त्यातील १९ कंपन्यांनी नोटिसीला उत्तर दिले. त्यातील १० कंपन्यांनी सकारात्मक उत्तर दिले तर ९ कंपन्यांनी जागा परत करण्याची तयारी दर्शविली. जागा घेतली त्यावेळी बाजारपेठेची स्थिती वेगळी होती आणि आता तर मंदीचे सावट आहे. अशा स्थितीत उद्योग सुरू करणे तोट्याचे असल्याचे उत्तर ९ कंपन्यांनी दिले. या कंपन्यांना वाढीव मुदत देण्यासंदर्भात लवकरच होणाऱ्या बोर्डाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जागा परत करण्याच्या तयारीत कंपन्याकंपनीजागामिलेनियम ड्रावेल१ एकरराजतरु इन्फोटेक एन्टरटेनमेंट २.५ एकरपॅरामाऊंट कंडक्टर्स १.७ एकरताज सॅट्स एअर कॅटरिंग २.५ एकरएल अ‍ॅण्ड टी इन्फोसिटी५० एकरगम फार्मा५ एकरझिटा सॉफ्टटेक१ एकरलाईटहाऊस सिस्टीम १ एकरइन्फॉमेटिक्स सोल्युसन्स१ एकर