शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पोक्सो प्रकरणातील ठाणेदाराच्या भूमिकेची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 00:39 IST

अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या आरोपीला वाचविण्याचे प्रयत्न करण्याच्या प्रकरणात लकडगंजचे ठाणेदार भानुदास पिदूरकर यांची काय भूमिका आहे, कशामुळे त्यांनी पोक्सोचे हे गंभीर प्रकरण प्रारंभी बेदखल केले होते, त्याची चौकशी सहायक पोलीस आयुक्त वालचंद्र मुंढे यांनी जवळपास पूर्ण केली आहे.

ठळक मुद्देएसीपींचा चौकशी अहवाल तयार : सोमवारी होणार सादर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या आरोपीला वाचविण्याचे प्रयत्न करण्याच्या प्रकरणात लकडगंजचे ठाणेदार भानुदास पिदूरकर यांची काय भूमिका आहे, कशामुळे त्यांनी पोक्सोचे हे गंभीर प्रकरण प्रारंभी बेदखल केले होते, त्याची चौकशी सहायक पोलीस आयुक्त वालचंद्र मुंढे यांनी जवळपास पूर्ण केली आहे. सोमवारी हा चौकशी अहवाल मुंढे यांच्याकडून परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांच्यापुढे ठेवला जाणार आहे. त्यानंतर या प्रकरणात कोणती कारवाई करायची, त्याचा निर्णय घेतला जाणार आहे.लकडगंजमधील एका गरीब घरच्या मुलीला(वय १५)प्रेमजाळ्यात ओढून एका आरोपीने तिच्या भविष्यासोबत नव्हे तर आयुष्यासोबतच खेळ केला आहे. या गंभीर प्रकरणाची तक्रार मुलीच्या आईने लकडगंज पोलीस ठाण्यात नोंदविण्याचा प्रयत्न केला होता. यात तातडीने पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल होण्याची अपेक्षा होती. मात्र, लकडगंजचे ठाणेदार पिदूरकर यांनी गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षिकेला (डब्ल्यू पीएसआय) कर्तव्यापासून परावृत्त करून ही तक्रार ‘अदखलपात्र’ (एनसी) करण्याचे सुचविले. या गंभीर प्रकरणाची माहिती सहायक पोलीस आयुक्त वालचंद्र मुंढे यांना मिळाली. त्यांनी ती पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांना सांगितली. उपायुक्त माकणीकर यांनी तडकाफडकी ठाणेदार पिदूरकर यांना याबाबत जाब विचारला. प्रकरण अंगलट येण्याचे संकेत मिळताच ‘मामाचा तक्रारअर्ज’ पुढे करण्यात आला. मात्र, हे गंभीर प्रकरण मुलीच्या आयुष्याशी जुळले असल्यामुळे उपायुक्त माकणीकर यांनी त्याची गंभीर दखल घेतली. या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे निर्देश उपायुक्त माकणीकर यांनी एसीपी मुंढे यांना दिले. त्यानुसार, मुढे यांनी प्राथमिक चौकशी करून या प्रकरणात पोक्सो कायद्यानुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. अर्थात प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीतच ठाणेदाराने गुन्हा दाखल न करण्याची गंभीर चूक केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कोणत्या कारणामुळे ठाणेदाराने पोक्सो प्रकरणात एवढी मोठी ‘रिस्क’ पत्करली त्याची चौकशी होणे बाकी होते, ती देखील आता पूर्ण झाल्याची माहिती आहे. हा चौकशी अहवाल पुढच्या दोन दिवसांत आपण पोलीस उपायुक्तांपुढे ठेवू, त्यानंतर वरिष्ठ पुढच्या कारवाईची दिशा ठरवतील, असे सहायक आयुक्त मुंढे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाPolice Stationपोलीस ठाणे