शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठ आॅनलाइन पेपर तपासणी घोटाळ्याची चौकशी, तीन सदस्यीय समितीची नेमणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 01:00 IST

मुंबई विद्यापीठातील आॅनलाइन मूल्यांकन प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्रधान सचिव एस.व्ही.आर. श्रीनिवास यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.

नागपूर : मुंबई विद्यापीठातील आॅनलाइन मूल्यांकन प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्रधान सचिव एस.व्ही.आर. श्रीनिवास यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. तत्कालीन कुलगुरूंसह कोणीही या समितीच्या चौकशीत दोषी आढळले तर कारवाई केली जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज विधानसभेत सांगितले.कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. गरज पडली तर फौजदारी कारवाईदेखील केली जाईल, हे सांगताना वायकर यांनी या मूल्यांकन घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची कबुली दिली.अतुल भातखळकर, सुनील शिंदे यांच्यासह जवळपास ३० सदस्यांनी या घोटाळ्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी या प्रकरणी कुलगुरूंची हकालपट्टी झालीअसली तरी ती पुरेशी नाही. उच्च शिक्षण मंत्री व राज्यमंत्र्यांनाही घरी पाठविले पाहिजे, असा हल्लाबोल केला.राज्य सरकारची परवानगी न घेताच आॅनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली होती, असा बचाव वायकर यांनी या वेळी केला. आॅनलाइन मूल्यांकनाचे काम ज्या कंपनीला देण्यात आले होते तिच्याशी कोणताही करार मुंबई विद्यापीठाने केलेला नव्हता. कराराविनाच काम देण्यात आले, ही चूकच होती, असे वायकर म्हणाले.या चुकीसाठी जबाबदार असलेल्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल, असे वायकर म्हणाले.प्रधान सचिव एस.व्ही.आर. श्रीनिवास यांच्या अध्यक्षतेखाली चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीमध्ये आयआयटी; मुंबईचे दीपक पाठक आणि व्हीजीटीआयचे धीरेन पटेल यांचा समावेश असल्याची माहितीही त्यांनी दिली.मुंबई विद्यापीठात पेपर तपासणीमध्ये गोंधळ झाल्यानंतर राज्यपालांनी कुलगुरूंचा राजीनामा घेतला होता. या प्रकरणाच्या तपासणीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. अनेक घटकांवर चौकशी करण्यात येणार असून त्यात दोषी आढळलेल्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होतील.- विनोद तावडे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Mumbai Universityमुंबई विद्यापीठ