शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
4
या देशाने आधीच भारतासोबत पंगा घेतला होता, आता पाकिस्तानचा उल्लेख करून ट्रम्प यांची स्तुती केली
5
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
6
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
7
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
8
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
9
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
10
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
11
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
12
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
13
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
14
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
15
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
16
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
17
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
18
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
19
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
20
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा

पात्रता निकष डावलून दिलेले प्रवेश अवैध

By admin | Updated: September 24, 2016 01:13 IST

अमरावती येथील दोन अभियांत्रिकी महाविद्यालयांनी पात्रता निकष डावलून दिलेले प्रवेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध ठरविले आहेत

हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय : अभियांत्रिकी महाविद्यालयांना दणकानागपूर : अमरावती येथील दोन अभियांत्रिकी महाविद्यालयांनी पात्रता निकष डावलून दिलेले प्रवेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध ठरविले आहेत. यामुळे महाविद्यालयांना जोरदार दणका बसला आहे.न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अतुल चांदूरकर यांनी हा निर्णय दिला. विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारे संचालित प्रा. राम मेघे अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय आणि श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाद्वारे संचालित अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात हे अवैध प्रवेश देण्यात आले. तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालकांनी १३ आॅगस्ट २०१६ रोजी दोन्ही महाविद्यालयांना पत्र पाठवून पात्रता निकष डावलून दिलेले प्रवेश अमान्य केले. याविरुद्ध महाविद्यालयांनी दोन रिट याचिका दाखल केल्या होत्या. न्यायालयाने या याचिका खारीज करून वरीलप्रमाणे निर्णय दिला.अभियांत्रिकी अभ्यासक्रमांतील एकूण जागांमध्ये २० टक्के व्यवस्थापन कोटा असतो. तसेच, केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनंतर रिक्त राहिलेल्या जागाही महाविद्यालयस्तरावर भरता येतात. परंतु, या जागा भरताना पात्रता निकष व गुणवत्ता डावलता येत नाही. नियमानुसार गुणवत्ता यादी तयार करून प्रवेश देणे आवश्यक आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांतील प्रवेशाकरिता अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के तर, आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५ टक्के गुणांची पात्रता निश्चित केली आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला ११ मार्च २०१६ पासून सुरुवात झाली. तेव्हापासून हे निकष अमलात आणण्यात आले. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत याच निकषानुसार सर्व प्रवेश देण्यात आले. यानंतर रिक्त राहिलेल्या जागा व व्यवस्थापन कोट्यातील जागा महाविद्यालयांना आपापल्यास्तरावर भरायच्या होत्या. यासंदर्भात २८ जुलै २०१६ रोजी परिपत्रक जारी करण्यात आले. असे असतानाही याचिकाकर्त्या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना पात्रता निकष डावलून प्रवेश दिलेत. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अक्षय सुदामे व अ‍ॅड. रणजित भुईभार तर, शासनातर्फे सहायक वकील नितीन रोडे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)संस्थेला तंबीया प्रकरणात श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने २१ आॅगस्ट २०१६ रोजी न्यायालयाच्या आदेशाबाबत गैरसमज पसरवणारी जाहिरात वृत्तपत्रांमध्ये दिली होती. न्यायालयाने यासंदर्भात कडक भूमिका घेऊन भविष्यात पुन्हा अशी चूक केल्यास गंभीर दखल घेतली जाईल अशी तंबी संस्थेला दिली.