शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
2
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
3
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
4
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
5
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
6
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
7
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
8
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
9
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
10
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
11
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
12
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
13
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
14
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
15
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
16
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
17
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
18
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
20
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइं (आ.) च्या मुलाखतीही वेगवेगळ्या

By admin | Updated: January 26, 2017 02:55 IST

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपाइंतील शहर अध्यक्षपदाचा वाद अजूनही सुटलेला नाही.

शहर अध्यक्षपदाचा वाद अजूनही कायम : उमेदवारांमध्ये संभ्रम नागपूर : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपाइंतील शहर अध्यक्षपदाचा वाद अजूनही सुटलेला नाही. आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती बुधवारी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पार पडल्या. पक्षाच्या सीताबडी येथील कार्यालयात राजन वाघमारे यांच्या नेतृत्वात मुलाखती घेण्यात आल्या. तर बाळू घरडे यांच्या गटाने लष्करीबाग येथील डॉ. आंबेडकर मिशन सभागृहात स्वतंत्र बैठक घेऊन मनपा निवडणुकीसाठी समिती स्थापन केली, तसेच १४ उमेदवारांच्या नावाची यादीही पक्की केली. त्यामुळे पक्षाच्या इच्छुक उमेदवारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आ.)चे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांनी पक्षातील शहर अध्यक्षपदाचा वाद संपल्याचे स्पष्ट करीत राजन वाघमारे हेच पक्षाचे अधिकृत शहराध्यक्ष असल्याचे जाहीर केले होते. परंतु बाळू घरडे यांचा गट अजूनही सक्रिय आहे. रिपाइं (आ.)ची भाजपसोबत युती आहे. जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. यातच बुधवारी पक्षाच्या सीताबर्डी येथील राहुल कॉम्प्लेक्स ब्लॉक नंबर ४६ या कार्यालयात पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. २४ प्रभागातून ३२७ उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी पहिल्या दिवशी १ ते १० प्रभागातील उमेदवारांनी पक्षाच्या पार्लमेंट्रीबोर्डसमोर मुलाखती दिल्या. प्रा. पवन गजभिये, दादाकांत धनविजय, विकास गणवीर, राजन वाघमारे, भीमराव मेश्राम, विनोद थूल, हरीश लंजेवार, राजेश ढेंगरे यांनी मुलाखती घेतल्या. उद्या पुन्हा मुलाखती होतील, असे शहराध्यक्ष राजन वाघमारे यांनी सांगितले. दुसरीकडे बाळू घरडे यांच्या नेतृत्वात लष्करीबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशन सभागृह येथे बैठक पार पडली. या बैठकीत मनपा निवडणूक समिती स्थापन करण्यात आली. या समितीत बाळू घरडे यांच्यासह इंजि. पद्माकर गणवीर, अ‍ॅड. भीमराव कंबळे, प्रा. संतोष रामटेके, डॉ. मनोज मेश्राम, अ‍ॅड. सुरेश घाटे, मधुकर लाडे, सुधीर नारनवरे, प्रा. राहुल वासनिक, रजनी वासनिक, सुनीता बहादुरे, बंटी अलेक्झांडर, सागर मानकर, बाबुलाल गाडे, राहुल मेश्राम, राजू गणवीर, संदेश खोब्रागडे, धर्मपाल गजभिये आणि संदेश भागवतकर यांचा समवेश आहे. या बैठकीत १४ उमेदवारांची यादीसुद्धा पक्की करण्यात आली आहे. पक्षातफे दोन वेगवेगळ्या मुलाखती घेण्यात आल्याने इच्छुक उमेदवारांसह सामान्य कार्यकर्त्यांमध्येसुद्धा संभ्रम कायम आहे. (प्रतिनिधी)