शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

नागपुरात फ्लॅटमध्ये सापडले आंतरराज्यीय सेक्स रॅकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 21:59 IST

गुन्हे शाखेच्या एसएसबीने जरीपटका येथील एका अपार्टमेेंटमध्ये सुरु असलेला देहव्यापाराचा आंतरराज्यीय अड्डा उघडकीस आणला. पोलिसांनी या अड्ड्याच्या सूत्रधाराकडून मुंबई आणि कोलकात्याच्या तरुणींना मुक्त केले.

ठळक मुद्देसूत्रधारास अटक : मुंबई-कोलकातातील तरुणींना केले मुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या एसएसबीने जरीपटका येथील एका अपार्टमेेंटमध्ये सुरु असलेला देहव्यापाराचा आंतरराज्यीय अड्डा उघडकीस आणला. पोलिसांनी या अड्ड्याच्या सूत्रधाराकडून मुंबई आणि कोलकात्याच्या तरुणींना मुक्त केले.निकिलेश केशव मुदलीयार (३०) रा. मनीष सोसायटी, काटोल रोड असे या अड्ड्याच्या मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. निकिलेश अनेक दिवसापसून देहव्यापाराच्या अड्डा चालवतो. त्याला दीड वर्षापूर्वी सुद्धा एसएसबीने मानकापूर येथे रंगेहात पकडले होते. यानंतर त्याने पुन्हा देहव्यापारचा अड्डा सुरु केला होता. पोलिसांना याची माहिती मिळाली. तो जरीपटका येथील तथागत चौकाजवळ असलेल्या अपूर्वा अपार्टमेंटमध्ये हा अड्डा चालवित होता.एसएसबीने बुधवारी सायंकाळी एक डमी ग्राहक निकिलेशच्या अड्ड्यावर पाठवला. त्याने ५ हजार रुपयात एका तरुणीचा सौदा केला. ग्राहकाकडून संकेत मिळताच पोलिसांनी धाड टाकली. त्याच्या अड्ड्यावर मुंबई आणि कोलकाता येथील प्रत्येकी एक तरुणी सापडली. या तरुणी दिल्लीच्या दलालाच्या माध्यमातून निकिलेशच्या संपर्कात आल्या होत्या. सूत्रानुसार मुंबईतील तरुणी १० दिवस आणि कोलकात्यातील तरुणी ५ दिवसाच्या करारावर नागपुरात आणल्या गेली होती. त्यांना १० हजार रुपये देण्याचे ठरले होते. या मोबदल्यात त्यांना २४ तासात ७ ग्राहकांना सेवा द्यायची होती.सूत्रानुसार निकिलेश देहव्यापार क्षेत्रातील दिग्गज नाव आहे. त्याच्याकडे ग्राहकांची लांबलचक यादी आहे. तो थेट ग्राहकांशी संपर्क साधून किंवा आॅनलाईनसुद्धा हा धंदा चालवतो. तो दुपारच्या वेळी सेवा देण्यासाठी ग्राहकाकडून १० हजार रुपयापर्यंत वसूल करतो. रात्रीसाठी १५ हजार रुपये घ्यायचा. तो ग्राहकांना फ्लॅटवर बोलावण्यासोबतच तरुणींना ग्राहकासोबत बाहेरही पाठवायचा. फार्म हाऊस आणि हॉटेलमध्ये होणाऱ्या पार्ट्यांमध्येही तो मुली उपलब्ध करून द्यायचा. शेजारी राज्यांपर्यंत त्याचे नेटवर्क पसरले आहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल आणि इतर दस्तावेज जप्त केले आहे.पोलिसांनी गेल्या दहा दिवसात देह व्यापाराचे ११ अड्डे उघडकीस आणले. एसएसबीने ६ अड्ड्यांवर धाड टाकली. तर झोन दोन व पाचने सुद्धा अशीच कारवाई केली. या धाडीमुळे देह व्यापार चालवणाºयांचे धाबे दणाणले आहे.ही कारवाई एसएसबीचे निरीक्षक विक्रम सिंह गौड, एपीआय संजीवनी थोरात, पीएसआय स्मिता सोनवणे, एएसआय दामोदर राजुरकर, हवालदार शीतला प्रसाद मिश्रा, मुकुंदा गारमोडे, मनोज सिंह, संजय पांडे, प्रफुल्ल बोंद्रे, प्रल्हाद डोळे, कल्पना लाडे, अस्मिता मेश्राम, अर्चना राऊत, अनिल दुबे आणि बळीराम रेवतकर यांनी केली.

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाNagpur Policeनागपूर पोलीस