शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
2
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
3
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
4
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
5
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
6
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
7
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
8
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
9
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
10
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
11
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
12
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
13
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
15
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
16
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
17
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
18
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
19
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
20
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली

एटीएम स्विच ऑफ करून रोकड उडविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा छडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 22:25 IST

त्यांच्याकडून पाच गुन्ह्यांची कबुली घेऊन २२ एटीएम कार्ड, मोबाईल आणि रोख रकमेसह पाच लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

नागपूर : एटीएममध्ये तांत्रिक बिघाड करून आतमधून रक्कम उडविणाऱ्या हरियाणातील एका टोळीचा नंदनवन पोलिसांनी छडा लावला. आसिफ खान जुम्‍मा खान (वय २१) आणि शहादत खान मोहम्मद या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पाच गुन्ह्यांची कबुली घेऊन २२ एटीएम कार्ड, मोबाईल आणि रोख रकमेसह पाच लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.आसिफ आणि शहादत हरियाणा राज्यातील मेवात येथील रहिवासी आहेत. एटीएममधून बेमालूमपणे रोकड काढण्यात ते सराईत आहेत. त्यांची एक मोठी टोळी असून वेगवेगळ्या प्रांतात, वेगवेगळ्या शहरात ते विशिष्ट प्रकारे एटीएममध्ये तांत्रिक बिघाड करतात आणि आत मधून रोकड उडवतात. एटीएमचा वरचा बॉक्स उघडणारी मास्टर चावी, पांना आणि पेचकसही त्यांच्याकडे असते. विशेष म्हणजे जोपर्यंत बँक अधिकारी एटीएममधील रकमेचा हिशेब करत नाही, तोपर्यंत ही चोरी लक्षात येत नाही. नागपुरात सक्करर्दरा, नंदनवन , वर्धमान नगर, हिंगणा आणि शहरातील अनेक भागात एटीएममधून त्यांनी अशा प्रकारे लाखो रुपये काढून घेतले.--- अशी आहे कार्यपद्धती आरोपी भल्या सकाळी एटीएममध्ये शिरतो. त्याच्या जवळचे एटीएम कार्डचा वापर करून व्यवहार सुरू करतो. काही वेळासाठी पाना घालून एटीएम मशीन ब्लॉक केली जाते. त्यानंतर एटीएमच्या वरतचे झाकण उघडून आरोपी तो व्यवहार अर्धवट राहील, अशी व्यवस्था करतात. त्यामुळे कॅश शटर मध्ये रोकड अडकून पडते. आरोपी ही रक्कम काढून पुन्हा दुसरा असाच व्यवहार करतात. अशा प्रकारे एका एटीएममध्ये पाच ते दहा वेळा रक्कम काढल्यानंतर आरोपी तेथून निघून जातात.---असा लागला छडानंदनवन पोलिसांच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संदिपान पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीने मास्क लावून असल्यामुळे त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. मात्र त्याच्या दुचाकीचा माग काढत पोलीस सीताबर्डीतील एका हॉटेलमध्ये पोहोचले. तेथून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे गेल्या आठवडात या दोघांनी शहरातील विविध भागात असलेल्या एटीएममधून लाखो रुपये काढले आणि भंडाऱ्याला गेले. भंडारा तसेच मौदा येथील एटीएम मध्ये त्यांनी चोरी केली आणि परत नागपुरातील हॉटेलमध्ये आले अन् त्यांची वाट बघत असलेल्या पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.--- विमान प्रवास करून चोरीआरोपी आसिफ आणि शहादत यांचे काही साथीदार मुंबईत असल्याचे समजते. ही हाय प्रोफाईल टोळी वेगवेगळ्या शहरात एटीएम फोडण्यासाठी चक्क विमानाने प्रवास करतात. या दोघांनी पोलिसांना नंदनवन, गिट्टीखदान, वाडी, प्रतापनगर आणि रेल्वे स्टेशन परिसरातील पाच एटीएम फोडल्याची कबुली दिली आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपयुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संदीपान पवार यांचे नेतृत्वात सहायक निरीक्षक शंकर धायगुडे, हवालदार संजय साहू, नायक विकास टोंग, संदीप गवळी, शिपाई प्रवीण भगत, विनोद झिंगारे, प्रेम कुमार खैरकर, स्वप्नील तांदूळकर, सुरेश तिवारी आणि पंकज पाटील आदींनी ही कामगिरी बजावली. आरोपींकडून अनेक गुन्ह्यांची कबुली मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.