शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

वीज मीटर वाचनासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 19:11 IST

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये महावितरणचे नाव सदैवच आघाडीवर आहे. मीटर वाचनामध्ये मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी व त्यादृष्टीने भविष्यात मीटर वाचनात येणाऱ्या संभाव्य समस्यांचे निराकरण करण्याच्या हेतूने ग्राहकांकडील वीज मीटरवरील नोंदी घेण्यासाठी स्वयंचलित मीटर वाचनासारखी आधुनिक यंत्रणा महावितरणतर्फे वापरल्या जात आहे.

ठळक मुद्देमहावितरण : मानवी हस्तक्षेप टाळणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये महावितरणचे नाव सदैवच आघाडीवर आहे. मीटर वाचनामध्ये मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी व त्यादृष्टीने भविष्यात मीटर वाचनात येणाऱ्या संभाव्य समस्यांचे निराकरण करण्याच्या हेतूने ग्राहकांकडील वीज मीटरवरील नोंदी घेण्यासाठी स्वयंचलित मीटर वाचनासारखी आधुनिक यंत्रणा महावितरणतर्फे वापरल्या जात आहे.महावितरणचे आज राज्यात सुमारे २ कोटी ५४ लाख उच्च दाब व लघु दाब वीज ग्राहक असून, त्यांच्या वीज वापराच्या नोंदी घेण्यासाठी स्वयंचलित मीटर वाचन, कॉमन मीटर रीडिंग इन्स्ट्रुमेंट, मोबाईल अ‍ॅप, फोटो मीटर रीडिंग या अत्याधुनिक मीटर वाचनाच्या पद्धतीसोबतच रेडिओ फ्रीक्वेन्सी व इन्फ्रारेड मीटर, प्री-पेड वीज मीटर यासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान असलेल्या वीज मीटरचा वापर करण्यात येत आहे. याशिवाय ग्राहकांच्या मीटर वाचनाप्रमाणे वीज बिल मिळण्याबाबतच्या तक्रारींच्या निराकरणासाठी महावितरणने आॅक्टोबर २०१६ पासून राबविलेल्या मोबाईल अ‍ॅप या संकल्पनेमुळे मीटर वाचनाचा स्थळाच्या अक्षांश व रेखांशाची नोंद मीटर वाचनासह घेण्यात येत असल्याने मीटरचे सदोष वाचन पूर्णत: संपुष्टात आले आहे.एएमआर आणि एमआरआय प्रणालीमहावितरणला सर्वाधिक व हमखास महसूल मिळवून देणाऱ्या उच्चदाब ग्राहकांसाठी स्वयंचलित मीटर वाचन (एएमआर) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून, त्याद्वारे ग्राहकांच्या मीटरजवळ बसविलेल्या इंटरनेट मोडेमेच्या साह्याने थेट महावितरणच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सर्वरमध्ये मीटर वाचनाच्या नोंदी दर महिन्याला नोंदविल्या जात आहेत. याशिवाय सिटी आॅपरेटेड मीटरचे वाचन करण्यासाठी मीटर वाचक (एमआरआय) साधनाचा वापर करून ग्राहकांकडील मीटरवरील वीज वापराच्या नोंदी थेट संगणक प्रणालीमध्ये नोंदविल्या जात आहे.आरएफ आणि आयआर मीटरराज्यात महावितरणने तब्बल ६४ लाखांवर ग्राहकांकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या रेडिओ फ्रीक्वेन्सी (आरएफ) व इन्फ्रारेड (आयआर) वीज मीटर बसविले असून, त्यांचे वाचन हॅन्डहेल्ड युनिटच्या साह्याने घेतल्या जात आहे, या युनिटद्वारे मानवी हस्तक्षेपरहितस्वयंचलितरीत्या प्रत्येक मीटरचा तपशील, मीटर वाचन आदी माहिती एकत्रित करून थेट महावितरणच्या संगणक प्रणालीमध्ये हस्तांतरित केल्या जात आहे.प्री-पेड मीटरवीज बिलाच्या वाढत्या थकबाकीला चाप लावण्यासाठी महावितरणने प्रायोगिक तत्वावर प्री-पेड मीटरचा वापर सुरू केला आहे, महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने दिलेल्या परवानगीनुसार मोबाईल रिचार्जप्रमाणे भरलेल्या पैशाच्या अनुषंगाने ग्राहकाला विजेचा वापर करता येत असून, रिचार्जची रक्कम संपण्यापूर्वी ग्राहकाला त्याची आगाऊ सूचना मिळण्याची सुविधाही यात उपलब्ध आहे. सध्या राज्यात २५ हजार ग्राहकांकडे प्री-पेड मीटर बसविण्यात आले आहेत.मोबाईल अ‍ॅप व एसएमएस सुविधामहावितरणने स्वत: विकसित केलेली मोबाईल अ‍ॅपची सुविधा आॅक्टोबर २०१६ पासून ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली असून, यामार्फत मीटर वाचन परस्पर माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सर्व्हरमध्ये पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामुळे ग्राहकांना मानवी हस्तक्षेपरहित अचूक वीज बिल देणे शक्य होत आहे. याशिवाय या अ‍ॅपच्या मदतीने ग्राहकालाही त्याच्या वीज मीटरवरील रीडिंग महावितरणच्या सर्व्हरवर पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे. अ‍ॅपद्वारे मीटर वाचन होताच महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंद केलेल्या वीज ग्राहकांना मीटर वाचनाची माहिती देणारा एसएमएस पाठविण्यात येत असून, एखाद्या ग्राहकाकडील मीटर वाचन काही अपरिहार्य कारणास्तव झाले नसल्यास सदर ग्राहकाला अ‍ॅपद्वारे मीटर रीडिंग पाठविण्याची विनंती एसएमएसच्या माध्यमातून केल्या जाते. याशिवाय ग्राहकांकडील मीटर वाचन, वीज वापर, त्यांना आलेले वीज बिल, बिल भरणा करण्याची अंतिम मुदत आदी माहितीही एसएमएसद्वारे मोबाईल क्रमांक नोंदणीकृत ग्राहकाला दिली जात आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज