शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन; हेकेखोरपणामुळे बोलीभाषेचे अस्तित्व संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 10:29 IST

अतिशुद्धीकरणाच्या अट्टाहासाने आणि इंग्रजीसाठीच्या हेकेखोरपणामुळे मराठी बोलीभाषा संपत असल्याचे संकेत सापडत आहेत.

प्रवीण खापरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या प्रमाणे मातेच्या उदरातून आपण जन्म घेतो, त्याच प्रमाणे प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या भाषेच्या उदरातच जन्माला येतो. तीला आपली मातृभाषा म्हटली जाते आणि मातृभाषेविषयी प्रत्येकाला प्रचंड आस्था असते.मात्र, अतिशुद्धीकरणाच्या अट्टाहासाने आणि इंग्रजीसाठीच्या हेकेखोरपणामुळे मराठी बोलीभाषा संपत असल्याचे संकेत सापडत आहेत. जगपातळीवर प्रत्येक भाषांची एक मुळ प्रमाणभाषा असते आणि त्याला जोडून नजिकच्या प्रदेशातील स्थळ, काळ आणि वातावरणानुसार भाषेची लय बदलत जाते. त्यात त्या त्या भागातील म्हणींचा वापर होतो, त्या प्रदेशाला अनुसरूण शब्दांची भर पडली असते, तेथील नागरिकांचा स्व:भावधर्मही त्यात उतरतो. तिच लय बोलिभाषा म्हणून प्रचलित होते.अशा बोलीभाषांची विशिष्ट लिपी नसते. प्रमाणभाषेच्या लिपितच या भाषा समाविष्ट होतात. जंगलात राहणाऱ्या आदिम जमातींच्या भाषांची स्वत:ची अशी लिपी नाही. या भाषाही बोलिभाषा म्हणून संबोधल्या जातात. पिढी दर पिढी या बोलिभाषा पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होत आल्या आहेत. या बोलींमधील साहित्य हे पिढ्यांच्या स्मरणशक्तीवरच टिकून राहील्या. त्यात म्हणी, गाणी, दंतकथांचा समावेश होतो. या सगळ्या बोलीभाषा कुणाच्या तरी मातृभाषाच आहेत. अहिराणी, कोंकणी, वºहाडी, झाडीबोली, गोंडी, माणदेशी, मालवणी, तमिळनाडूमध्ये तंजावूर येथे बोलली जाणारी तंजावरी या भाषा मराठीतील बोलीभाषा आहेत.हा गोडवा त्याच्या त्याच्या मातृभाषेचा आहे. मात्र, हा गोडवा पुढे राहील का? अशी भिती वाटायला लागली आहे. त्याचे कारण म्हणजे, शाळांतून बोलिभाषेला गावंढळ म्हटले जाऊन विद्यार्थ्यांच्या तोंडी प्रमाणभाषेचा आग्रह धरला जातो आणि ज्या भागात प्रमाणभाषेचे प्राबल्य आहे, तेथे पालकांकडून इंग्रजीचा अट्टहास धरला जात आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठीचे प्रयत्न अद्याप फलित झालेले नाही आणि सरकारकडूनच मराठीला दुय्यम वागणूक दिली जाऊन मराठी शाळा बंद पाडल्या जात आहेत.

जिथे जावे, तिथे गोडवाप्रत्येक जिल्ह्णानूसार, जाती-धर्मानुसार भाषेच्या विशिष्ट शैलीही जपल्या जातात. जसे नागपूरची बोलीभाषा, अमरावतीपेक्षा भिन्न आहे. भंडारा, गोंदिया येथील भाषेची लहेजा आणि चंद्रपूर, गडचिरोलीपेक्षा वेगळाच भासतो. विदर्भाच्या पलिकडे गेले तर वाशिम, नांदेड, लातूर मध्ये भाषेचा स्वर बदललेला असतो. पुण्यापेक्षा मुंबईच्या बोलीत अंतर आहे. तिकडे पुन्हा धाराशिव, कोल्हापूर, सातारा येथील भाषेत भिन्नता सापडते आणि कोकणात वेगळ्या मराठी बोलीचा स्वर कानावर पडतो तर कोष्टी समाजाची कोष्टी बोली, कुणबी समाजाची कुणबी बोली, सिंध्यांची सिंधी बोली अन् मारवाड्यांची मारवाडी बोली याही कानावर पडतच असतात.

या दिनाचा संदर्भ२१ फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस जगभरात साजरा केला जातो. मुळात बांग्लादेशी नागरीकांच्या बॉन्ग्ला भाषा आंदोलनामुळे, हा दिवस युनेस्कोतर्फे सन २००० पासून जगभरात साजरा केला जातो. या दिवसाला नोव्हेंबर १९९९मध्ये मान्यता प्राप्त झाली. स्व:भाषा संवर्धन आणि बोलण्याचा अधिकार हा संदर्भ या मातृभाषा दिवसाच्या मागचा आहे.

टॅग्स :marathiमराठी