शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

नागपुरात ‘पिफ’चा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल; मास्टरक्लास आणि चर्चासत्र 

By सुमेध वाघमार | Updated: March 1, 2024 18:57 IST

फिल्म फेस्टिव्हलअंतर्गत ९ आणि १० मार्च रोजी सकाळी १० ते रात्री ८.३० वाजतापर्यंत एकूण १६ सत्रे असतील.

नागपूर: प्रख्यात दिग्दर्शक आणि ‘पिफ’चे संचालक डॉ. जब्बार पटेल यांच्या मार्गदर्शनात येत्या ८, ९ व १० मार्च २०२४ रोजी नागपुरात ‘२२व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलची नागपूर आवृत्ती’चे आयोजन करण्यात आले आहे. मेडिकल चौक येथील व्हीआर, नागपूरमधील सिनेपोलिसमध्ये हा फेस्टिव्हल होत असल्याची माहिती शुक्रवारी आयोजित पत्रपरिषदेत ‘पिफ’ नागपूर आवृत्तीचे अजेय गंपावार यांनी दिली. यावेळी रुपेश पवार उपस्थित होते. 

महाराष्ट्र शासनाद्वारे प्रस्तुत, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, सांस्कृतिक कार्य संचालनालय, पुणे फिल्म फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मेराकी थिएटरच्या सहकार्याने आयोजित या फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन ८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता होईल. डॉ. जब्बार पटेल यांच्यासह ‘पिफ’चे क्रिएटिव्ह डायरेक्टर; फिल्मगुरू समर नखाते, डेप्युटी डायरेक्टर विशाल शिंदे हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. यानंतर ‘टेरेस्ट्रियल व्हर्सेस’ ही इराणी ‘ओपनिंग फिल्म’ प्रदर्शित होईल. 

१४ फिल्म्स आणि दोन सत्रे या फिल्म फेस्टिव्हलअंतर्गत ९ आणि १० मार्च रोजी सकाळी १० ते रात्री ८.३० वाजतापर्यंत एकूण १६ सत्रे असतील. यात १४ फिल्म्स आणि दोन विशेष सत्र असतील. या तीन दिवसांत दहा ग्लोबल फिल्म्स, दोन इंडियन फिल्म्स, दोन मराठी फिल्म्स तसेच एक डॉक्युमेंटरी सादर होणार आहेत. ग्लोबल फिल्म्स आणि वर्ल्ड कॉम्पिटिशनच्या कॅटेगरीत दोन इराणी, दोन पोर्तुगिज, दोन फ्रेंच, दोन इटालियन, एक इजिप्तची आणि एक स्पॅनिश फिल्म बघता येणार आहे. ‘जिप्सी’ आणि ‘छबिला’ हे दोन मराठी चित्रपट यात सादर होणार आहेत. दोन इंडियन कॅटेगरीतील फिल्म्स असून यात एक मेघालयचीही फिल्म असणार आहे. 

मास्टरक्लास आणि चर्चासत्र यासोबतच या दोन दिवसांत एक मास्टरक्लास आणि एक चर्चासत्र नियोजित आहे. मास्टरक्लास प्रसिद्ध अभिनेता आणि कास्टिंग डायरेक्टर अभिषेक बॅनर्जी घेणार आहे. चर्चासत्रात राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक शंतनू रोडे, दिग्दर्शक शैलेश नरवाडे, दिग्दर्शक छत्रपाल निनावे, निमार्ते नरेंद्र जिचकार, अभिनेता ऋतुराज वानखेडे हे यात सहभागी होणार असून सूत्रसंचालन डॉ. ऋता धर्माधिकारी करणार आहे. विशेष म्हणजे, ‘जिप्सी’ चित्रपटाचे दिग्दर्शक शशी खंदारे व ज्युरी पुरस्कार विजेता बाल कलाकार कबीर खंदारे हेही महोत्सवाला हजेरी लावणार आहेत.

विशेष वर्कशॉप या फिल्म फेस्टिव्हलनिमित्त उद्घाटनाच्या एक दिवस आधी; ७ मार्च २०२४ रोजी दुपारी ३ वाजता राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संपदा व्यवस्थापन संस्था सभागृह, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ कार्यालयासमोर, हिस्लॉप कॉलेज रोड, सिव्हिल लाइन्स येथे फिल्मगुरू समर नखाते यांचे ‘अंडरस्टॅण्डिंग सिनेमा’ हे विशेष फिल्म अ‍ॅप्रिसिएशन वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे.  या महोत्सवासाठी मेडिकल चौकातील व्हीआर,  सिनेपोलिसमध्ये किंवा उत्तर अंबाझरी मार्गावरील राष्ट्रभाषा भवन (अमृत भवनच्या शेजारी) येथे नोंदणी सुरू आहे.

टॅग्स :nagpurनागपूर