शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

आंतरराष्ट्रीय फॅक्ट चेकिंग दिन; निवडणुकीच्या प्रचारात फेक न्यूजचा भडीमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 11:35 IST

निवडणूक आयोगाने आचारसंहिता लावून प्रचारादरम्यान होणाऱ्या चुकीच्या बाबींवर आळा घातला आहे. पण सोशल मीडियाला आचारसंहिता लागू पडत नाही. त्याचाच फायदा राजकीय पक्षाच्या आयटी सेलचे कार्यकर्ते घेत आहेत.

ठळक मुद्देप्रचारासाठी राजकीय पक्ष करताहेत वापरनागरिकांनी सावध राहावे

अंकिता देशकर।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणूक आयोगाने आचारसंहिता लावून प्रचारादरम्यान होणाऱ्या चुकीच्या बाबींवर आळा घातला आहे. पण सोशल मीडियाला आचारसंहिता लागू पडत नाही. त्याचाच फायदा राजकीय पक्षाच्या आयटी सेलचे कार्यकर्ते घेत आहेत. फेक न्यूजच्या माध्यमातून अ‍ॅन्टी प्रचार करण्यात येत आहे. यातून नेत्यांच्या प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत आहे.याचे नुकतेच उदाहरण पाहायचे झालेत तर, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी राजकारणात पदार्पण केल्यानंतर सोशल मीडियावर एक संदेश आणि मातोंडकर यांचा फोटो व्हायरल झाला. ज्यात लिहिले होते की त्यांनी पाकिस्तानच्या मोहसीन अख्तर मीर यांच्यासोबत निकाह केला. पण उर्मिला मातोंडकर यांच्याबद्दल माहिती गूगलवर शोधल्यास असे कळेल की त्यांचे पती हे काश्मीरचे रहिवासी आहेत, पाकिस्तानचे नाही. तसेच, प्रियांका गांधी वाड्रा यांच्या एका रॅलीमधील फोटो व्हायरल झाला. ज्यात त्यांच्या गळ्यात क्रॉस दिसला, विविध मजकुरासह हा फोटो शेअर केल्या जात होता. पण काही विश्वसनीय फॅक्ट-चेकरनी तोच फोटो पडताळल्यास असे आढळले की त्यांच्या गळ्यात एक पांढऱ्या रंगाचं पेन्डंट होते. फोटो शॉपवरून त्यांच्या गळ्यात क्रॉस दाखविण्यात आला. फक्त फोटो-शॉपवरून फोटोच शेअर केले जातात असे नाही, तर व्हिडीओदेखील विविध मजकुरांसोबत फेसबुक, टिष्ट्वटरवर बघायला मिळतात. नुकताच गंगा सफाई मंत्री उमा भारती यांचा एक व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल झाला. यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विनाश पुरुष असा उल्लेख केला आहे. हा व्हिडीओ २ मिनिटे ७ सेकंदाचा असून, त्या एका पत्रकार परिषदेत बोलताना दिसतात. या व्हिडीओला फॅक्ट चेक केले. तो १७ एप्रिल २०१४ रोजीचा असल्याचे समोर आले. उमा भारती यांनी असे वक्तव्य केले ही गोष्ट तेव्हाची आहे, जेव्हा भाजपसोबत त्यांचे संबंध चांगले नव्हते आणि त्या स्वत:चा एक राजकीय पक्ष भारतीय जनशक्ती पार्टी सुरू करण्याच्या विचारात होत्या. या सगळ्या दिशाभूल करणाºया बातम्यांना आळा घालू शकत नाही; पण मग सामान्य माणूस म्हणून त्यातील तथ्य शोधणे गरजेचे आहे. त्यासाठीसुद्धा तंत्रज्ञान आहे. सोशल मीडियावर राहणाऱ्यांनी अशा फेक न्यूजची फॅक्ट जाणून घेणे गरजेचे आहे. जेणेकरून सामान्य जणांना निवडणुकीच्या काळात पारदर्शी निर्णय घेता येईल.

लोकशाहीमध्ये नागरिकांनी मतदान करण्याचा हक्क बजावण्यासह विविध राजकीय पक्ष व नेत्यांच्या प्रचाराचे टीकात्मक दृष्टीने निरीक्षण करावे. वर्तमान काळात सोशल मीडियावर फेक न्यूजचा महापूर वाहत आहे. यामध्ये चुकीच्या पोस्ट, वैयक्तिक आरोप, असामान्य दावे, धक्कादायक फोटो किंवा वक्तव्य, शासकीय साधनांचा वापर करून जात, धर्म, वर्ण, लिंग, भाषा आदींच्या नावाने लोकांचे विभाजन करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा सर्व पोस्टबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याची अत्यंत आवश्यकता निर्माण झाली आहे.- डॉ. मोईज मनन हक, सदस्य मीडिया सर्टिफिकेशन अ‍ॅन्ड मॉनिटरिंग कमिटी, निवडणूक आयोग, नागपूर व रामटेक लोकसभा

सध्या ‘मिसइन्फॉर्मेशन’च्या युद्घात सोशल मीडियाचा वापर करणाºया सामान्य नागरिकांना चुकीच्या माहितीद्वारे दिशाभूल करणारे लोक निवडणुकीच्या काळातही सज्ज झाले आहेत. हे लोक चुकीच्या पद्धतीने तुमचे मत प्रभावित करण्याची शक्यता वाढली आहे. अशावेळी नागरिकांनी सतर्क राहून ‘फॅक्ट चेकिंग वेबसाईट्स’ आणि ‘फॅक्ट चेकर्स’द्वारे मांडल्या जाणाºया सत्यतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे, कारण फॅक्ट चेकर्सद्वारे तळापर्यंत जाऊन बातमी किंवा माहितीची सत्यता पडताळली जाते.- जेन्सी जेकब, मॅनेजिंग एडिटर, बूम (फॅक्ट चेकिंग वेबसाईट)

तुम्ही काय करू शकताकोणतीही बातमी विविध सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर करण्यापूर्वी ती तपासून बघा. ती तपासायला तुम्ही एक साधा गूगल सर्च करून ती बातमी अजून कुठे प्रकाशित झाली आहे का हे बघू शकता. नाही तर, देशातील काही ‘फॅक्ट-चेकिंगह्ण वेबसाईटवर त्या सापडतायत का ते बघू शकता.

एक साधा गूगल रिव्हर्स इमेज सर्च देखील तुम्ही तुमच्या लॅपटॉप आणि मोबाईल फोनवर सहज करू शकता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक