शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलसमर्थक शोमा सेनची अंतर्गत चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 20:59 IST

नक्षली कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या प्रा. शोमा सेन यांच्या निवृत्ती लाभासंदर्भातील प्रक्रिया राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने थांबविली आहे. त्यांना पदव्युत्तर इंग्रजी विभागाच्या सहयोगी प्राध्यापक या पदावरून निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांच्याविरोधात अंतर्गत चौकशी करण्यात येत असून त्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठाकडून विशेष समिती स्थापित : निवृत्तिलाभाची प्रक्रियाही थांबविली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नक्षली कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या प्रा. शोमा सेन यांच्या निवृत्ती लाभासंदर्भातील प्रक्रिया राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने थांबविली आहे. त्यांना पदव्युत्तर इंग्रजी विभागाच्या सहयोगी प्राध्यापक या पदावरून निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांच्याविरोधात अंतर्गत चौकशी करण्यात येत असून त्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.नक्षली कारवायांमधील सहभागी, पुण्यातील ‘एल्गार’ परिषदेच्या माध्यमातून हिंसेला प्रोत्साहन देण्याच्या आरोपाखाली ६ जून रोजी पुणे पोलिसांनी प्रा. शोमा सेन यांना त्यांच्या निवासस्थानाहून ताब्यात घेतले होते. याप्रकरणी त्यांच्यासह एकूण पाच लोकांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, सुधीर ढवळे आणि रोना विल्सन यांचा समावेश होता. प्रा. सेन विद्यापीठाच्या सेवेत असल्याने अटकेनंतर ४८ तासांच्या आत त्यांचे निलंबन होणे आवश्यक होते. मात्र दबावगट सक्रिय झाल्याने विद्यापीठाने कारवाईस टाळाटाळ केली व निलंबन झालेच नाही. यासंदर्भात अखेर कुलगुरूंनी कायदेशीर सल्ला घेतला व प्रा. सेन यांना निलंबित करण्यात आले.या निलंबनानंतर विद्यापीठ वर्तुळात निरनिराळे मतप्रदर्शन झाले होते. डॉ. सेन यांच्या या कृत्यांसंदर्भात पोलिसांकडूनदेखील विद्यापीठाला सविस्तर पत्र पाठविण्यात आले. याच्या आधारावर विद्यापीठाने त्यांच्याविरोधात चौकशीसाठी अंतर्गत समिती गठित केली आहे. या समितीत कायदेशीर तज्ज्ञांचाही समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ.नीरज खटी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. डॉ.सेन यांच्याविरोधात चौकशी सुरू असून याचा अहवाल यायला साधारणत: काही महिने लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले.विद्यापीठातील इतरांची चौकशी होणार का?डॉ.सेन यांच्यासह विद्यापीठातील आणखी काही जणांवर सुरक्षायंत्रणांची नजर होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. डॉ.सेन यांच्या विभागातील कार्यप्रणालीसोबतच विद्यापीठातील अशा व्यक्तींसंदर्भात चौकशी होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाnaxaliteनक्षलवादी