शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

बोगस बियाण्यांची आंतरराज्यीय तस्करी : जिल्ह्याचे सीमावर्ती गावे टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 8:01 PM

खरीप हंगाम तोंडावर येताच बोगस बियाण्यांचा सुळसुळाट वाढतो. कमी किमतीत आणि आकर्षक पॅकेजिंगमध्ये बियाणे असल्याने शेतकरी त्याला बळी पडतात. कृषी विभागातर्फे बोगस बियाण्यांवर आळा घालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भरारी पथकाने काही ठिकाणी धाडी टाकून लाखो रुपयांचे बोगस बियाणे जप्तही केले आहे. बोगस बियाण्यांच्या विक्रीचे थेट कनेक्शन आंध्र प्रदेश, गुजरात व मध्य प्रदेश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. हा सर्व व्यवसाय जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून चालत असल्याचे काही धाडीतून सिद्ध झाले आहे.

ठळक मुद्देआंध्र आणि गुजरातमधून येतात बियाणे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खरीप हंगाम तोंडावर येताच बोगस बियाण्यांचा सुळसुळाट वाढतो. कमी किमतीत आणि आकर्षक पॅकेजिंगमध्ये बियाणे असल्याने शेतकरी त्याला बळी पडतात. कृषी विभागातर्फे बोगस बियाण्यांवर आळा घालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भरारी पथकाने काही ठिकाणी धाडी टाकून लाखो रुपयांचे बोगस बियाणे जप्तही केले आहे. बोगस बियाण्यांच्या विक्रीचे थेट कनेक्शन आंध्र प्रदेश, गुजरात व मध्य प्रदेश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. हा सर्व व्यवसाय जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून चालत असल्याचे काही धाडीतून सिद्ध झाले आहे.खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना कमी किमतीत बोगस बियाणे देऊन दामदुप्पट पैसे उकळणाऱ्या टोळ्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत़ जिल्ह्याच्या सीमावर्ती गावांतील शेतकऱ्यांना लक्ष्य करून आकर्षक रंगाच्या पॅकेजमधील माल शेतकऱ्यांना पुरविल्या जातो आहे. या रॅकेटमधील सूत्रधाराची काम करण्याची पद्धतीसुद्धा अफलातून आहे़ आपल्या मूळ ठिकाणाहून बियाणे बोलवायचे झाल्यास रेल्वे, कुरिअरने किंवा ट्रॅव्हल्सने हा माल शहराच्या वेशीवर दाखल होतो. तसेच काही कृषी केंद्र संचालकांना गाठून अवास्तव कमिशनचे आमिष देऊन त्यांना विक्रीचे प्रमाण वाढविण्याचे सांगण्यात येते़ कुही तालुक्यातील आंभोरा, पचखेडी, मांढळ, भंडारा जिल्ह्यातील मोहाडी आणि नागपुरातील मौदा, रामटेकच्या आदिवासीबहुल भाग आणि मध्य प्रदेशची सीमा असलेल्या पारशिवनी तालुक्यातील कोलीतमारा, केळवद भागातही या बोगस बियाणे विक्रीचे प्रकार वाढले आहे़ या प्रकाराला स्वत: जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दुजोरा दिला आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर भागात तर अख्खी गावेच्या गावे बोगस बियाण्यांच्या पॅकेजिंगचे कामे करतात व विक्रीसाठी त्याची पद्धतशीरपणे विल्हेवाट लावली जाते़ नागपुरातील एजंटाशी संपर्क साधून हे बियाणे विक्रीला पाठविले जाते़ दुसरीकडे शेतकऱ्यांनी ब्रॅण्डेड बियाणेच खरेदी करावेत़ बाजारात कमी किमतीत आणि आकर्षक वेष्टनाला बळी पडून शेतकऱ्यांनी फसवणूक करून घेऊ नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे़ यंत्रणा अपुरीबोगस बियाण्यांची विक्री दरवर्षी मोठ्या प्रमाणात होते. कारण त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच अपुरी आहे. कृषी विभागाकडून भरारी पथक स्थापन केले जाते. पण त्यातही कर्मचाऱ्यांची मर्यादा असते. तपासासाठी वाहने नाहीत. पोलीससारख्या यंत्रणेचे सहकार्य नाही. कृषी केंद्राच्या संचालकांना मिळणाऱ्या कमिशनमुळे, धाडी टाकूनही सोर्स उघडे करीत नाही. त्यामुळे दरवर्षी बोगस बियाण्यांची खरेदी करून शेतकरी फसविले जात आहे.

टॅग्स :agricultureशेतीSmugglingतस्करी