शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

गांजा तस्करीचे कनेक्शन आंतरराज्यीय टोळीशी

By admin | Updated: September 3, 2016 01:17 IST

‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ मोहिमेदरम्यान पोलिसांच्या हाती एक अ‍ॅम्ब्युलन्स लागली. यात मोठ्या प्रमाणावर गांजा आढळून आला.

६२ बॉक्समध्ये सापडला ७६५ किलो गांजा : मध्य प्रदेशातील रिवामध्ये धाडसत्र नागपूर : ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ मोहिमेदरम्यान पोलिसांच्या हाती एक अ‍ॅम्ब्युलन्स लागली. यात मोठ्या प्रमाणावर गांजा आढळून आला. हा गांजा आंतरराज्यीय टोळीचा होता. अ‍ॅम्ब्युलन्समध्ये ६२ बॉक्समध्ये ७६५ किलो गांजा सापडला. याची किंमत ७६ लाख ५१ हजार रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. पोलिसांनी या टोळीच्या शोधात तीन चमू मध्य प्रदेशातील रिवा येथे पाठविल्या आहे. तिथे अनेक ठिकाणी पोलिसांनी धाडी टाकल्या. गुरुवारी रात्री ९.४५ वाजता कळमना पोलीस ठाणे हद्दीत कापसी पुलाजवळ एका अ‍ॅम्ब्युलन्समध्ये गांजा जप्त करण्यात आला. अ‍ॅम्ब्युलन्स चालक आणि त्याचा साथीदार फरार झाले. भंडारा रोडवर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह कारवाईसाठी येथे वाहतूक पोलीस तैनात केले जातात. इंदोरा शाखेतील पोलीस कर्मचारी प्रशांत मिसाळ यांना भंडाराकडे जात असलेल्या अ‍ॅम्ब्युलन्सचा चालक निष्काळजीपणे वाहन चालवित असल्याचे आढळून आले. प्रशांतने एमपी/ १७/ डी/ ०२५२ क्रमांकाच्या अ‍ॅम्ब्युलन्स चालकाला थांबण्याचा इशारा केला. त्याने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. पोलीस कर्मचाऱ्याने बाईकने अ‍ॅम्ब्युलन्सचा पाठलाग केला. अ‍ॅम्ब्युलन्स चालकाने सरळ न जाता हैद्राबादच्या दिशेने गाडी वळवली. परंतु त्याच वेळी प्रशांतने त्याला अडवले. वाहनचालक खाली उतरला. पोलीस कर्मचारी त्याला वाहनाचे कागदपत्र मागू लागला. त्याचवेळी चालकाचा साथीदार पळू लागला. प्रशांत त्याच्या दिशेने पळू लागताच चालकही फरार झाला. पोलीस कर्मचाऱ्याने अ‍ॅम्ब्युलन्सची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. ज्या पद्धतीने गांजाचे पॅकिंग करण्यात आले होते, त्यावरून तस्कर हे व्यावसायिक असल्याचे दिसून येते. गांजाची गुणवत्ता कमजोर आहे. यासारख्या गांजाची मागणी लहान शहरांमध्ये किंवा गावांमध्ये अधिक असते. पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे, पीएसआय नरेंद्र पुरी, हवालदार दत्ता बागुल, विठोबा काळे, प्रवीण फांदडे, शिपाई सतीश पाटील, नितीन रांगणे, किशोर महंत, तुलसी शुक्ला आणि नरेश शिंगणे यांनी कारवाई केली. (प्रतिनिधी)मध्य प्रदेशाशी संबंध सूत्रानुसार गांजा तस्कर मध्य प्रदेशातील रिवाशी संबंधित आहेत. अ‍ॅम्ब्युलन्सचा मालक बिछिया रिवा येथील मो. जफी खलील खान असल्याचे सांगितले जाते. पोलिसांना अ‍ॅम्ब्युलन्समध्ये दोन मोबाईलसुद्धा सापडले. त्यांच्या आधारावर अ‍ॅम्ब्युलन्स कुठून आली, हे लक्षात येईल. नशेत होता चालक अ‍ॅम्ब्युलन्स चालक नशेत होता. त्यामुळेच तो पोलीस कर्मचाऱ्याला पाहून घाबरला. दोघेही पळून गेल्यावर पोलिसांनी लगेच भंडारा रोड परिसराची घेराबंदी केली. यानंतरही ते पोलिसांच्या हाती लागले नाही. त्यामुळे ते यापूर्वी सुद्धा या रोडने येत-जात असल्याचा संशय आहे.