शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कर्नाटकमधील आंतरराज्यीय अण्णा टोळी गवसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 23:34 IST

वाहनचालकांचे वेगवेगळ्या प्रकारे लक्ष विचलित करून कारमधून रोख तसेच मौल्यवान चीजवस्तू लंपास करणाऱ्या कर्नाटकमधील आंतरराज्यीय अण्णा टोळीचा गुन्हे शाखा, युनिट क्रमांक ३ च्या पथकाने छडा लावला. या टोळीतील दोन महिलांसह तिघांना पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देतिघांना अटक : रोख आणि साहित्य जप्तचार आरोपी फरार : गुन्हे शाखेची कामगिरी

आॅनलाईन लोकमतनागपूर : वाहनचालकांचे वेगवेगळ्या प्रकारे लक्ष विचलित करून कारमधून रोख तसेच मौल्यवान चीजवस्तू लंपास करणाऱ्या कर्नाटकमधील आंतरराज्यीय अण्णा टोळीचा गुन्हे शाखा, युनिट क्रमांक ३ च्या पथकाने छडा लावला. या टोळीतील दोन महिलांसह तिघांना पोलिसांनी अटक केली. व्यंकटेश बाबू नायडू (वय ३८, रा. जाविदनगर, सिगोमा, कर्नाटक), अलमेलू रमेश ऊर्फ शिवा शेट्टी (वय २७, रा. कोयंपनगर, सिगोमा, कर्नाटक) आणि लक्ष्मी ऊर्फ मारी मुतब्बा शेट्टी (वय २७, रा. कोयंपनगर, सिगोमा कर्नाटक), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यातील नायडू डम्पिंग यार्ड, सूरजनगर (नंदनवन) तर शेट्टी पारडी (कळमना) भागात भाड्याच्या खोलीत राहायचे.कारमधील बॅगवर नजर जाताच ती अवघ्या काही क्षणात उडविण्यात ही टोळी सराईत आहे. दिवस-रात्र या टोळीचे सदस्य विविध भागात फिरत असतात. कधी वाहनाची चाकं पंक्र करून, कधी घाण टाकून तर कधी वाहनाखाली आॅईल टाकून ही टोळी कारमधील रोख किंवा मौल्यवान चीजवस्तू असलेली बॅग लंपास करते. फाटक्या नोटा बदलवून देणाºया गणेशपेठ कॉटन मार्केट चौकातील एका आरोपीची साडेतीन लाखांची बॅग ३० डिसेंबर २०१७ च्या रात्री आरोपींनी अशाच प्रकारे लंपास केली होती. त्याचा तपास करताना पोलिसांना या टोळीतील सदस्य डम्पिंग यार्डजवळ भाड्याने राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी या भागातील एका घरी धडक देऊन आधी नायडूला आणि त्याने दिलेल्या माहितीवरून नंतर पारडीतील दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी पंक्चर करण्यासाठी वापरला जाणारा टोचा, आॅईल, ४६,५९० रुपये, दीपक शर्मा नामक व्यक्तीचे आधारकार्ड, बँक आॅफ महाराष्ट्रचे पावती बुक आणि स्पोर्टस् बॅग जप्त केली. टोळीचा म्होरक्या आपल्या तीन साथीदारांसह पसार होण्यात मात्र यशस्वी ठरला. पकडलेल्या आरोपींनी गणेशपेठ पोलीस ठाण्यांतर्गत ३० डिसेंबर २०१७ च्या गुन्ह्याची कबुली दिली. याशिवाय जून ते डिसेंबर महिन्यात लकडगंज भागात केलेल्या अन्य तीन गुन्ह्यांचीही कबुली दिली.चोरीची रोकड बँकेत?आरोपींकडे बँकेचे पावती बुक आढळले. त्यामुळे चोरी केलेली रक्कम आरोपी बँकेत जमा करून सुरक्षित करीत असावेत, असा संशय आहे. ज्यांच्याकडून आरोपींनी भाड्याने खोल्या घेतल्या त्यांना ते आम्ही कपडे विकतो, असे सांगायचे. कपड्याचा गठ्ठा घेऊन ते सकाळीच घराबाहेर पडायचे. त्यामुळे घरमालक अथवा परिसरातील नागरिकांना त्यांचा संशय येत नव्हता. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांचा छडा लावण्यात अखेर यश मिळवलेच.पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे, गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम तसेच सहायक आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट क्रमांक ३ चे पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर, प्रभाकर शिवरकर, उपनिरीक्षक मंगला मोकाशे, हवालदार शत्रुघ्न कडू, शैलेष ठवरे, सुरेश हिंगणेकर, अनिल दुबे, मनीष भोसले, अतुल दवंडे, श्याम कडू तसेच फिरोज सत्येंद्र यादव यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसRobberyदरोडा