शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय सज्ज ठेवण्याचे निर्देश; मेयो, मेडिकलमध्ये ‘मॉकड्रील’

By सुमेध वाघमार | Updated: April 10, 2023 19:16 IST

Nagpur News शहरात कोरोनाचा वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मेयो व मेडिकल या दोन्ही शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा रुग्णांना तपासण्यापासून ते त्यांना आॅक्सिजन लावण्यापर्यंतच्या कार्याचे ‘मॉकड्रील’ घेतले.

सुमेध वाघमारेनागपूर :  शहरात कोरोनाचा वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मेयो व मेडिकल या दोन्ही शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा रुग्णांना तपासण्यापासून ते त्यांना आॅक्सिजन लावण्यापर्यंतच्या कार्याचे ‘मॉकड्रील’ घेतले. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी सुद्धा संभाव्य धोका टाळण्यासाठी मनपा रुग्णालयांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले.

       नागपूर शहर व ग्रामीणमध्ये मागील १० दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या ३८१वर पोहचली आहे. सध्या ३३२ कोरोनाचे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत. यातील ३१६ रुग्ण गृहविलगीकरणात तर १६ रुग्ण शासकीयसह विविध खासगी रुग्णालयात भरती आहेत. कोरोनाच्या संसगार्चा धोका लक्षात घेऊन राधाकृष्णन बी. यांच्या निदेर्शानुसार अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सोमवारी मनपाच्या विविध रुग्णालयांना भेट देउन वैद्यकीय आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय गांधी नगर, पाचपावली स्त्री रुग्णालय आणि आसोलेशन रुग्णालयाची पाहणी केली. येथील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आॅक्सिजन आणि खाटांच्या व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता सुनील उईके, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी उपस्थित होते. जोशी यांनी आरोग्य विभागाला आॅक्सिजन पाईप लाईनची तपासणी करणे, स्वच्छता राखणे आणि कोव्हिड रुग्णाला भरती करण्याची तयारी ठेवण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस