शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसात वाहन जमा करण्याचे निर्देश : अन्यथा गुन्हे दाखल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 23:33 IST

निवडणुकीच्या कामासाठी वाहन देण्यास टाळाटाळ होत असल्याबद्दल निवडणूक विभागाने शंभरावर विभागप्रमुखांना नोटीस बजावली आहे. येत्या दोन दिवसात वाहन न दिल्यास गुन्हा दाखल केला जाईल, अशी ताकीद देण्यात आल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देनिवडणूक विभागाची १०० विभागांना नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकीच्या कामासाठी वाहन देण्यास टाळाटाळ होत असल्याबद्दल निवडणूक विभागाने शंभरावर विभागप्रमुखांना नोटीस बजावली आहे. येत्या दोन दिवसात वाहन न दिल्यास गुन्हा दाखल केला जाईल, अशी ताकीद देण्यात आल्याची माहिती आहे.विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. नागपूर जिल्ह्यात १२ मतदार संघाकरिता निवडणूक होत आहे. याकरिता १६०० वर वाहनांची गरज आहे. यात ७०० वर सरकारी वाहने असून, उर्वरित वाहने खासगी घेण्यात येणार आहे. वाहनासाठी १५० वर विभागांना पत्र पाठविण्यात आले. मात्र आतापर्यंत ३०० च्या जवळपासच वाहने जमा झाली. अनेक विभागाने अजूनही वाहन दिलेले नाही. वाहन देण्यास टाळाटाळ होत असल्याने निवडणूक विभागाच्या पथकाने थेट वाहन जप्तीची मोहीम सुरू केली आहे. काही वाहनातून चालक आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांना उतरवून जप्त करण्यात आले. स्मरणपत्र दिल्यावरही वाहन दिले नसून काहींनी तर वाहन लपवून ठेवले आहे. निवडणूक विभागाचे कर्मचारी गेल्यास वाहन नसल्याचे उत्तर देण्यात येते. उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. त्यामुळे आता वाहन देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग