शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बालकांसाठी काम करणाऱ्या संस्थांवर येणार गाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 12:19 IST

बाल न्याय अधिनियम २०१५ व महाराष्ट्र राज्य बाल न्याय नियम २०१८ अन्वये शासनाने बालकांसाठी काम करणाऱ्या संस्थांना नोंदणी करणे अनिवार्य केले आहे.

ठळक मुद्दे३० आॅगस्ट नोंदणीची अंतिम तिथी अन्यथा गुन्हे दाखल करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाल न्याय अधिनियम २०१५ व महाराष्ट्र राज्य बाल न्याय नियम २०१८ अन्वये शासनाने बालकांसाठी काम करणाऱ्या संस्थांना नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. येत्या ३० आॅगस्टपर्यंत ही नोंदणी करायची आहे. ज्या संस्था नोंदणी करणार नाही, त्या संस्था बंद पाडून, संबंधित संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.बालकांची काळजी आणि संरक्षणासाठी शासक ीय संस्थांबरोबरच स्वयंसेवी संस्थासुद्धा कार्यरत आहेत. दत्तकगृह, बालगृह मुलांची काळजी आणि संरक्षणाचे काम करतात. नागपूर जिल्ह्यात ख्रिश्चन मिशनरी, स्वयंसेवी संस्था व शासनाचे दत्तकगृह व बालगृह आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांनी अधिकृत नोंदणी केली नाही. परंतु गेल्या काही वर्षांत देशात बालकांच्या बाबतीत घडत असलेल्या अत्याचाराच्या घटना, दत्तकगृहातून होणाऱ्या मानवी तस्करीच्या घटना लक्षात घेता, सर्व स्वयंसेवी संस्थांचे बालगृह व दत्तकगृह शासनाच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी त्यांची नोंदणी करण्याचा निर्णय महिला व बालकल्याण आयुक्तालयाने घेतला आहे. या नोंदणीसाठी विभागाच्या वेबसाईटवर अर्जसुद्धा उपलब्ध आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ३२ स्वयंसेवी संस्थांनी नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. ज्या संस्था अद्यापही अर्ज करू शकल्या नाही त्यांना ३० आॅगस्टपर्यंत शेवटची संधी आहे. त्यानंतर अशा संस्था आढळल्यास थेट कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी विजयसिंग परदेसी यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्य