शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वाघिणीला मारण्याऐवजी जेरबंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 22:52 IST

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील नरभक्षक टी १ वाघिणीला ठार करण्यासाठी तेलंगणातील हैदराबाद येथून खाजगी शूटर नवाब शाफत अली याला पाचारण करण्यात आले आहे. या वाघिणीला ठार न करता तिला जेरबंद करावे, या मागणीसाठी विदर्भातील सर्पमित्र, वन्यजीव रक्षकांनी बुधवारी विदर्भ वन्यजीव रक्षक संघटनेच्यावतीने उपराजधानीत आंदोलन केले. महाराज बाग येथून रॅली काढून वन्यजीव रक्षकांनी आपला आवाज बुलंद केला.

ठळक मुद्देवन्यजीव रक्षकांचा एल्गार : संविधान चौकात केली निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील नरभक्षक टी १ वाघिणीला ठार करण्यासाठी तेलंगणातील हैदराबाद येथून खाजगी शूटर नवाब शाफत अली याला पाचारण करण्यात आले आहे. या वाघिणीला ठार न करता तिला जेरबंद करावे, या मागणीसाठी विदर्भातील सर्पमित्र, वन्यजीव रक्षकांनी बुधवारी विदर्भ वन्यजीव रक्षक संघटनेच्यावतीने उपराजधानीत आंदोलन केले. महाराज बाग येथून रॅली काढून वन्यजीव रक्षकांनी आपला आवाज बुलंद केला.वाघिणीला ठार न करता तिला जेरबंद करावे, शार्प शूटर शाफत अली यास परत पाठवावे, या मागण्या आंदोलनकर्त्यांनी लावून धरल्या. यावेळी महाराज बाग येथून संविधान चौकापर्यंत रॅली काढून ‘शाफत अली वापस जाओ’च्या घोषणा दिल्या. यावेळी आंदोलनकर्त्यांनी वाघाची वेशभूषा करून आंदोलनात सहभाग नोंदविला. वनविभागाने यापूवीर्ही बोर व्याघ्रप्रकल्पात सोडलेल्या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी नवाब अली याला पाचारण केले होते. आताही नवाबलाच बोलविण्यात आले. वन विभागाकडे यंत्रणा असूनही खाजगी शूटर नवाबला का बोलविण्यात येते, असा प्रश्न वन्यजीवप्रेमींनी उपस्थित केला. वनविभागाने अनेक सहायक वनसंरक्षक, विभागीय वनाधिकाऱ्यांना वाघिणीला जेरबंद करण्याचे प्रशिक्षण दिलेले आहे. राज्यात प्रशिक्षित अधिकारी आणि पशुवैद्यकीय डॉक्टरांची चमू असताना खाजगी शूटरला वनविभागाने परत पाठविण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी संविधान चौकात अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव पूर्व) सुनील लिमये यांनी वनविभागाच्यावतीने निवेदन स्वीकारून वनजीवप्रेमींच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणी वन विभागाला थोडा वेळ द्या, आम्ही तुमचे म्हणणे वनमंत्र्यांपर्यंत पोहोचवितो, असे त्यांनी यावेळी सांगितले. आंदोलनकर्त्यांनी यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के. मिश्रा यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सोपविले. यावेळी पराग दांडगे, आकाश विहिरे, माधव वैद्य, राज इरने, अनुप येरणे, रत्नदीप वानखेडे, नीलेश मेश्राम, राहुल कोठेकर, श्रीराम रसाळ, जेरील बानाईत यांच्यासह विदर्भातील विविध संघटनांचे वन्यजीव रक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Tigerवाघagitationआंदोलन