शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

‘सीझेडए’कडून नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरचे निरीक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 23:26 IST

उपराजधानीचे महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळ महाराज बाग प्राणिसंग्रहालय व गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या रेस्क्यू सेंटरचे गुरुवारी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, (सीझेडए) नवी दिल्लीचे पदाधिकारी डॉ. बी. के. गुप्ता यांनी निरीक्षण केले. मात्र, महाराजबाग प्राणिसंग्रहालयाच्या मंजुरीला घेऊन डॉ. गुप्ता काय बोलले, यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलण्याचे टाळल्याने प्रश्नचिन्ह कायम आहे.

ठळक मुद्देमहाराज बाग प्राणिसंग्रहालयाचीही केली पाहणीप्राणिसंग्रहालयाच्या मंजुरीवर प्रश्नचिन्ह कायम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीचे महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळ महाराज बाग प्राणिसंग्रहालय व गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या रेस्क्यू सेंटरचे गुरुवारी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, (सीझेडए) नवी दिल्लीचे पदाधिकारी डॉ. बी. के. गुप्ता यांनी निरीक्षण केले. मात्र, महाराजबाग प्राणिसंग्रहालयाच्या मंजुरीला घेऊन डॉ. गुप्ता काय बोलले, यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलण्याचे टाळल्याने प्रश्नचिन्ह कायम आहे.डॉ. गुप्ता यांनी गुरुवारी सकाळी १०.३० वाजता महाराज बाग प्राणिसंग्रहालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी प्राण्यांना ठेवण्यात येणाऱ्या पिंजऱ्यांचे निरीक्षण केले. त्यानंतर ते प्राणिसंग्रहालयाचे नियंत्रक व कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता के.डी. ठाकूर, सचिव राजेश चव्हाण आणि प्राभारी डॉ. सुनील बावस्कर यांच्याशी भेटून चर्चा केली. सुत्रानूसार, डॉ. गुप्ता यांनी मागे केलेल्या महाराज बाग प्राणिसंग्रहालयाच्या निरीक्षणात जी विकास कामे सांगितली होती ती त्यांना दिसून आली नाहीत. यावर डॉ. गुप्ता यांची काय प्रतिक्रिया होती यावर महाराजबाग प्रशासनाने बोलणे टाळले. विशेष म्हणजे, ३१ डिसेंबर २०१६ मध्ये महाराज बाग प्राणिसंग्रहालयाची परवानगी संपायला आली असताना डॉ. गुप्ता यांनी महाराज बागेची पाहणी केली होती. ‘सीझेडए’ गेल्या दहा वर्षांपासून वन्य प्राण्यांची सुरक्षा आणि नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून देण्यावर सूचना देत आला आहे. गोरेवाडा संरक्षण केंद्राचीही पाहणीडॉ. गुप्ता यांनी दुपारी २.३० वाजताच्यासुमारास गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या रेस्क्यू सेंटरला भेट दिली. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच येथील संरक्षण केंद्राची पाहणी केली. सोबतच वन्यप्राणी, पर्यटकांशी संबंधित सोयी, प्रशासकीय कामकाजाचेही अवलोकन केले. त्यानंतर त्यांनी रेस्क्यूचे व्हेटरनरी डॉ. विहंग धूत, डॉ. भोजने आणि गोरेवाडाचे विभागीय व्यवस्थापक काळे यांच्याशी चर्चा केली. पिंजऱ्यांना घेऊन नाराजीमहाराज बाग प्राणिसंग्रहालयातील वन्यप्राण्यांचे लोखंडी पिंजरे फार जुने झाले आहेत. महाराज बाग प्रशासनाकडे पिंजरे आणि संरक्षण भिंतीला घेऊन पर्याप्त जागा आहे. मात्र त्यांचे झालेले दुर्लक्ष यावर डॉ. गुप्ता यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते.