शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती घोटाळ्याची ‘सीबीआय’मार्फत चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 19:28 IST

शासनाचा हस्तक्षेप टाळण्यासाठी राज्यातील शिष्यवृत्ती घोटाळ्याची ‘सीबीआय’मार्फत चौकशी करण्यात यावी अशी विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला करण्यात आली आहे. न्यायालयाने सोमवारी राज्य शासन, विशेष तपास पथक व सर्व संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावून यावर १४ फेब्रुवारीपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाला विनंती : राज्य शासनाला मागितले उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाचा हस्तक्षेप टाळण्यासाठी राज्यातील शिष्यवृत्ती घोटाळ्याची ‘सीबीआय’मार्फत चौकशी करण्यात यावी अशी विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला करण्यात आली आहे. न्यायालयाने सोमवारी राज्य शासन, विशेष तपास पथक व सर्व संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावून यावर १४ फेब्रुवारीपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. रामटेक येथील दृष्टी बहुउद्देशीय शिक्षण, पर्यटन व पर्यावरण विकास संस्थेने यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे. शैक्षणिक संस्थांचे संचालक शासनाची शिष्यवृत्ती हडपण्यासाठी अभ्यासक्रमांत बोगस विद्यार्थ्यांचे प्रवेश दाखवतात. तसेच, विद्यार्थी अपात्र असतानाही शिष्यवृत्तीसाठी दावे सादर करतात. संस्था संचालक व शासकीय अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशिररीत्या शिष्यवृत्ती वाटप होत आहे. परिणामी, शासनाचे कोट्यवधी रुपये संस्था संचालक व अधिकाऱ्यांच्या खिशात जात आहेत असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.विशेष तपास पथकाने आतापर्यंत केवळ १३.४३ टक्के शिक्षण संस्थांची चौकशी करून २४ जुलै २०१७ अहवाल सादर केला आहे. पथकाने दोषी शिक्षण संस्थांवर काढलेली वसुली दोन हजार कोटी रुपयांवर आहे. पुढील चौकशी थांबविण्यात आली आहे. ही चौकशी पूर्ण केल्यास वसुलीचा आकडा १५ हजार कोटी रुपयांवर जाऊ शकतो. परिणामी, उर्वरित चौकशी पूर्ण करण्यात यावी व चौकशीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात यावा असेही याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. आदित्य देशपांडे यांनी बाजू मांडली.शासनावर ताशेरेशासनाने काढलेल्या शिष्यवृत्तीच्या वसुलीविरुद्ध काही शिक्षण संस्थांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. त्यात न्यायालयाला शासनाकडून समाधानकारक सहकार्य मिळाले नाही. परिणामी, न्यायालयाने शासनावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. शासनाने या प्रकरणाबाबत उदासीन भूमिका स्वीकारली आहे. न्यायालयाच्या आदेशाशिवाय एकही कागद पटलावर ठेवला जात नाही. हे सर्व खेदजनक आहे असे न्यायालयाने म्हटले. तसेच, मुख्य सचिवांना यावर एक आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिलेत. याप्रकरणात याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. आनंद परचुरे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयOrder orderआदेश केणे