शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलमधील दुरवस्थेची सात दिवसांत चौकशी करा : उपसभापतींचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 22:26 IST

उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’मधील दुरवस्थेबाबत सात दिवसात चौकशी करावी व कुणी दोषी आढळल्यास कारवाई करावी, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी दिले.

ठळक मुद्देअस्वच्छता, तांत्रिक बिघाड, निकृष्ट भोजनासंदर्भात विरोधक आक्रमक

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’मधील दुरवस्थेबाबत सात दिवसात चौकशी करावी व कुणी दोषी आढळल्यास कारवाई करावी, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी दिले. अनिल सोले यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते हे विशेष.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये प्रचंड अस्वच्छता आहे. शिवाय तेथे नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे रुग्णांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. जैविक कचरादेखील वेळेत उचलला जात नाही. कंत्राटी कर्मचारी स्वच्छता करतात व त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. रुग्णांना आहारात पुरेशा पोळ्या दिल्या जात नाही व जेवणाचा दर्जा निकृष्ट असतो. तसेच बरेच दिवस उद्वाहने बंद असल्यामुळे रुग्णांची अडचण झाली असा आरोप अनिल सोले, नागो गाणार यांनी केला. हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई हवी, अशी मागणी डॉ.रणजित पाटील यांनी केली. राष्ट्रवादीचे प्रकाश गजभिये यांनीदेखील तेथील रिक्त जागांचा मुद्दा उपस्थित केला. यावर बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात लोकप्र्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले.रुग्णालयाच्या वॉर्डंमधील जैविक कचरा संकलन केंद्रात ठेवला जातो. हा जैविक कचरा नागपूर महानगरपालिका मान्यताप्राप्त कंपनीकडून संकलन केंद्रातून दररोज उचलला जातो. रुग्णालयामधील अजैविक कचराही महानगरपालिकेमार्फत उचलला जातो. जेवणाच्या दर्जाची तपासणी वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येते. रुग्णालय प्रशासनामार्फत रुग्णाच्या आरोग्याबाबत व त्याअनुषंगाने पुरवावयाच्या सुविधेबाबत योग्य काळजी घेतली जाते. तरीसुद्धा नागरिक व लोकप्रतिनिधींना याबाबत काही शंका असल्यास संबंधितांची लवकरच रुग्णालयात बैठक आयोजित केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. परंतु हे उत्तर साफ चुकीचे असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी विरोधकांनी मागणी केली. यावर उपसभापतींनी चौकशीचे निर्देश दिले.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेGovernment Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय