शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आयनॉक्स मॉल : ३६ कोटी रुपये करचोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 23:00 IST

आयनॉक्स पूनम मॉलच्या मालकाने न भरलेला एकूण २३ कोटी रुपये संपत्ती कर आणि त्यापोटी लावण्यात आलेला १३ कोटी रुपये दंड, असे एकूण ३६ कोटी रुपये कर वसूल करण्याची तयारी मनपाने सुरू केली असल्याचे समजते.

ठळक मुद्देमनपा करणार लिलाव, ‘ग्लोबल ऑक्शन’ची तयारीनगररचना विभागाकडून मॉलची किंमत ६६ कोटी निश्चित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धमाननगर येथील आयनॉक्स पूनम मॉलच्या मालकांनी २००६ पासून संपत्ती कर भरण्याकडे कानाडोळा केल्याने, त्याअनुषंगाने दंडाची राशी सतत वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे, या मॉलचा लिलाव करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. मॉलच्या मालकाने न भरलेला एकूण २३ कोटी रुपये संपत्ती कर आणि त्यापोटी लावण्यात आलेला १३ कोटी रुपये दंड, असे एकूण ३६ कोटी रुपये कर वसूल करण्याची तयारी मनपाने सुरू केली असल्याचे समजते.संपत्ती कर विभागाशी निगडित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार बुधवारी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्या संमतीनंतर आयनॉक्स मॉलचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी लकडगंज झोनला लिलावासाठी आवश्यक ती प्रक्रिया  पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्याअनुषंगाने मनपाच्या नगररचना विभागाने मॉलचे मुल्यांकन केले असून, मॉलची किंमत ६६ कोटी रुपये निर्धारित केली आहे. त्यात बांधकामाची किंमत २९ कोटी तर जमीनीची किंमत ३७ कोटी रुपये निश्चित करण्यात आली. त्यामुळे, लिलावाची मुळ किंमत ६६ कोटी रुपये इतकी असेल. आकडा मोठा असल्याने, ही प्रक्रीया ‘वैश्विक लिलाव (ग्लोबल ऑक्शन)’द्वारे पार पाडण्याची सूचनाही देण्यात आली आहे. ही संपूर्ण प्रक्रीया लकडगंज झोन अंतर्गत पार पडेल.अनेकदा पाठविल्या नोटीसमॉल व्यवस्थापनाशी जुळलेल्या कंपनीला अनेकदा मनपाच्या कर विभागातर्फे नोटीस जारी करून प्रलंबित कर भरण्याची सूचना देण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, कंपनीकडून त्याअनुषंगाने कुठलेच पाऊले उचलली नाही. त्यामुळे, प्रलंबित करासोबतच दंडाची राशीही वाढत गेली. हा आकडा बराच मोठा असल्याने लिलाव प्रक्रीयेत मॉलला खरेदीदार मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याच कारणाने ग्लोबल ऑक्शनचा निर्णय घेण्यात आला आहे.लिलावातून वसूल केला जाईल करलिलाव प्रक्रीयेची मुळ किंमत ६६ कोटी रुपये निर्धारित करण्यात आली आहे. या राशीतून मनपा ३६ कोटी रुपये कर वसूल करेल आणि ऊर्वरित रक्कम मॉल व्यवस्थापनाकडे सोपवली जाणारआहे. मात्र, यासाठी सहा महिन्याच्या आत व्यवस्थापनाला मनपाकडे अर्ज द्यावा लागणार आहे. निर्धारित काळात अर्ज प्राप्त न झाल्यास संपूर्ण राशी मनपा आपल्याकडे ठेवणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर