शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरकरांसाठी अभिनव महापौर चषक डिजिटल पारिवारिक समूह गीतगायन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 22:25 IST

कोरोनामुळे एकांतवासात आलेली निराशा दूर करण्यासाठी महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्यावतीने आणि संस्कार भारतीच्या सहकार्याने ‘महापौर चषक डिजिटल पारिवारिक समूह गीतगायन स्पर्धा’ हा उपक्रम राबविला जाणार आहे.नागपुरातील प्रत्येक परिवाराला या स्पर्धेत घरबसल्या सहभागी होता येणार आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनच्या दिवसात पर्वणी : स्पर्धा सर्वांसाठी खुली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे एकांतवासात आलेली निराशा दूर करण्यासाठी महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्यावतीने आणि संस्कार भारतीच्या सहकार्याने ‘महापौर चषक डिजिटल पारिवारिक समूह गीतगायन स्पर्धा’ हा उपक्रम राबविला जाणार आहे.नागपुरातील प्रत्येक परिवाराला या स्पर्धेत घरबसल्या सहभागी होता येणार आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गायकच असावे, असे बंधन नाही. ही स्पर्धा प्रत्येक कुटुंबासाठी असून कुटुंबातील कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त आठ व्यक्ती यात सहभागी होऊ शकतील.‘कुटुंब रंगलंय गाण्यात’ या संकल्पनेखाली ही स्पर्धा असून यात भक्तिगीत, सिनेगीत अथवा देशभक्ती गीत गाता येईल. एका कुटुंबाला तीन वर्गवारीपैकी कुठल्याही दोन वर्गवारीमध्ये सहभागी होता येईल. त्यासाठी वेगवेगळे प्रवेश अर्ज दाखल करावे लागतील. स्पर्धा पूर्णपणे डिजिटल माध्यमातून आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. अर्जात स्पर्धेसाठी तयार केलेला फक्त १०० एमबी आकाराचा व्हिडिओ जोडायचा आहे. गीते ही हिंदी अथवा मराठी भाषेतील असावी. व्हिडिओतील गीतांचा कालावधी पाच मिनिटांपेक्षा अधिक नसावा. यामध्ये आपल्या कुटुंबातीलच सदस्यांचा समावेश असेल. आॅडिओट्रॅक बॅकग्राऊंड म्युझिकचा वापर करता येईल. स्वतंत्र वाद्यवृदांचा समावेश केलेली गीते स्पर्धेत सहभागी केली जाणार नाहीत. गीतांची निवड, त्यातील सकारात्मक संदेश, एकूण सादरीकरण, वेशभूषा या बाबींचा परीक्षणादरम्यान विचार करण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश अर्जासह व्हिडिओ पाठविण्याची अंतिम तारीख १५ मे राहील.तिन्ही गटातील विजेत्या पारिवारिक चमूंना प्रथम महापौर चषक व रु. २१ हजार रोख, द्वितीय रुपये १५ हजार रोख, तृतीय रु. ११ हजार रोख तसेच रु. एक हजारचे पाच प्रोत्साहन पुरस्कार प्रमाणपत्रासह नागपूर महानगरपालिकेच्यावतीने देण्यात येतील.असा घ्यावा प्रवेशप्रवेशासाठी आणि व्हिडिओ अपलोड करण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि संस्कार भारतीच्या वतीने गुगल फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे.ttps://forms.gle/nRVcxPgUJ21tibky8 या लिंकवर गुगल फार्म उपलब्ध आहे. नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत फेसबुक पेज, अधिकृत ट्विटर हॅण्डल आणि इन्स्टाग्रामवर ही लिंक उपलब्ध राहील.

टॅग्स :Mayorमहापौरmusicसंगीत