शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विमानतळावर ‘स्टॅम्प’च्या शाईमुळे जखम होण्याचा क्रम सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 15:42 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’ करण्यासाठी लावण्यात येणाऱ्या ‘स्टॅम्प’मुळे हातावर जखम होण्याचा क्रम सुरूच आहे.

ठळक मुद्देमनपाच्या अधिकाऱ्यांचे मौनशाईच्या दर्जाची तपासणी कधी होणार ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’ करण्यासाठी लावण्यात येणाऱ्या ‘स्टॅम्प’मुळे हातावर जखम होण्याचा क्रम सुरूच आहे. यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईबाबत बोलण्यास संबंधित अधिकारी टाळत आहेत.७ जून रोजी ‘स्टॅम्प’च्या शाईमुळे जखमी होण्याची तक्रार आली होती. त्यानंतर विमानतळ व्यवस्थापनाला जवळपास आठ तक्रारी मिळाल्या आहेत. या सर्व तक्रारी मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत. यानंतरदेखील तक्रारी येत आहेत. नागरिकांना निकृष्ट दर्जाच्या शाईमुळे होणाऱ्या जखमांच्या प्रकरणांना गंभीरतेने घेतले जात नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे. यासंबंधात प्रतिक्रियेसाठी मनपाचे अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.मुंबईत नोकरी करणारे स्नेहा व राकेश मून हे ५ जून रोजी पुणेमार्गे विमानाने नागपुरात पोहोचले होते. विमानतळावर ‘स्टॅम्प’ लावण्यात आलेली जागा सुजली होती. दोघांचाही उपचार करावा लागला. संबंधित शाई ही अतिशय निकृष्ट दर्जाची होती. त्यामुळे ‘इन्फेक्शन’ व जखम झाली. त्वचेवर शाईचा उपयोग करण्याच्या अगोदर त्याचा दर्जा व इतर बाबींची तपासणी झाली पाहिजे, असे मत ‘फिजिशिअन’ डॉ. सिद्धांत भरणे यांनी व्यक्त केले. याअगोदर गोवा व कोकणातदेखील असे प्रकरण झाले आहे.सर्व तक्रारी मनपाकडे जातातयासंदर्भात आम्हाला ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून जितक्या तक्रारी मिळाल्या, त्या सर्व मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांना ‘ऑनलाईन’च पाठविण्यात आल्या आहेत. १३ जून रोजी शाई बदलविण्यात आली होती, असे मनपाने सांगितले आहे.-आबिद रुही, वरिष्ठ विमानतळ संचालक‘टॅटू’सारखे ‘स्टॅम्पिंग’ केले जातेयहवाई प्रवास करून नागपुरात आल्यानंतर सोमवारी एका प्रवाशाने नाव न प्रकाशित करण्याच्या नावावर धक्कादायक माहिती दिली. ‘क्वारंटाईन’ करण्याच्या नावाखाली केवळ ‘टॅटू’प्रमाणे ‘स्टॅम्पिंग’ केले जाते. स्केच पेनाने तारीख लिहिली जाते व ती पाण्याने लवकरच मिटते. ज्या जागेवर ‘टॅटू’प्रमाणे ‘स्टॅम्प’ लावल्या जात आहे तेथेच जळजळ होते. यासाठी कुठली शाई वापरण्यात येत आहे व यात कुठले रसायन आहे याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस