जखमी बिबट गोरेवाड्यातील प्राणी बचाव केंद्रात उपचारासाठी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 11:22 PM2020-06-27T23:22:00+5:302020-06-27T23:23:30+5:30

मोरगाव (गोंदिया) वन क्षेत्रामध्ये जखमी अवस्थेत आढळलेल्या एका बिबट्याला उपचारासाठी गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रात दाखल करण्यात आले आहे.या बिबट्याचे मागील दोन्ही पायांना जबर दुखापत झाल्यामुळे त्याला चालताना अडचण होत आहे.

Injured leopard admitted to Gorewada Animal Rescue Center for treatment | जखमी बिबट गोरेवाड्यातील प्राणी बचाव केंद्रात उपचारासाठी दाखल

जखमी बिबट गोरेवाड्यातील प्राणी बचाव केंद्रात उपचारासाठी दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोरगाव (गोंदिया) वन क्षेत्रामध्ये जखमी अवस्थेत आढळलेल्या एका बिबट्याला उपचारासाठी गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रात दाखल करण्यात आले आहे.या बिबट्याचे मागील दोन्ही पायांना जबर दुखापत झाल्यामुळे त्याला चालताना अडचण होत आहे.
राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) त्यांच्या आदेशानुसार या जखमी बिबट्याला गोरेवाडा येथील वन्यप्राणी बचत केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला जखमी अवस्थेत येथे आणण्यापूर्वी साकोली येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकिशोर खोडस्कर यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर अर्जुनी तहसील मोरगाव वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी त्याला शासकीय वाहनातून गोरेवाडा वन्य प्राणी बचाव केंद्रात पाठविले. येथे डॉ. मयूर पावशे व डॉ. शालिनी ए.एस. यांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली असता कमरेखालील भाग पूर्णत: लुळा पडल्याचे लक्षात आले. मागील दोन्ही पाय कमरेतून घसरल्यामुळे तो बºयाच प्रमाणात जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. यावेळी वनपाल आर.डी. वलथरे, वनरक्षक हरीश किनकर व गोरेवाडा प्रकल्पाचे वनरक्षक आर.एच. वाघाडे प्रमुख्याने उपस्थित होते.

Web Title: Injured leopard admitted to Gorewada Animal Rescue Center for treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.