शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जल, पर्यावरण संवर्धनासाठी संघ घेणार पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 14:40 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख तशी तर सामाजिक संघटना म्हणून आहे. मात्र आता देशात जल व पर्यावरण संवर्धन व्हावे यासाठीदेखील संघाकडून पुढाकार घेण्यात येणार आहे. यासंदर्भात संघाच्या राष्ट्रीय पातळीवर संघटन बैठकीत सखोल मंथन झाले.

ठळक मुद्देसमाजाला सोबत घेऊन चळवळ राबविणार रुपरेषा तयार करण्याची प्रांतांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख तशी तर सामाजिक संघटना म्हणून आहे. मात्र आता देशात जल व पर्यावरण संवर्धन व्हावे यासाठीदेखील संघाकडून पुढाकार घेण्यात येणार आहे. यासंदर्भात संघाच्या राष्ट्रीय पातळीवर संघटन बैठकीत सखोल मंथन झाले. समाजाला सोबत घेऊन याबाबत देशपातळीवर चळवळ राबविण्याचा संकल्प यात घेण्यात आला. तसेच देशात प्रांतनिहाय रुपरेषा तयार करण्याची सूचनादेखील करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीला आंध्र प्रदेशमध्ये ३१ आॅगस्ट रोजी सुरुवात झाली. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत तसेच सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्यासह संघ परिवारातील व समाजातील विविध संघटनांच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची यात उपस्थिती होती. या बैठकीत वर्तमान सामाजिक, आर्थिक परिस्थिती, शिक्षणक्षेत्राची स्थिती, कृषी, पर्यावरण यांच्यासह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. पर्यावरण संवर्धन हा महत्त्वाचा विषय होता. केवळ शासनपातळीवर पुढाकार घेऊन प्रश्न सुटणार नाही. शाश्वत तोडग्यासाठी समाजाला घेऊन पुढाकार घेण्याची गरज आहे, असा बैठकीतील पदाधिकाऱ्यांचा सूर होता. संघाकडून देशातील काही क्षेत्रात जलसंवर्धन तसेच पर्यावरण रक्षणासाठी प्रकल्प राबविण्यात येतात. मात्र याचा आता विस्तार करण्यासाठी प्रयत्न व्हावेत आणि जनतेला जोडण्यासाठी पाऊल उचलले गेले पाहिजे, असे ठरविण्यात आले. जल व पर्यावरण संवर्धनासाठी नेमके काय प्रकल्प राबविता येतील, तसेच कुठे जास्त प्रमाणात प्रयत्नांची आवश्यकता आहे, याचा अभ्यास करण्यात येईल व त्यानंतर उपाययोजनांसाठी चळवळ उभारावी, अशी सूचना यावेळी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जैविक कृषी पद्धतीचा सुरू आहे प्रचार-प्रसारमागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात भोपाळ येथे संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीच्या बैठकीत जैविक कृषीपद्धतीच्या प्रचार-प्रसाराचा निर्णय झाला होता. यानुसार देशातील अनेक क्षेत्रात संघाचे प्रकल्प सुरू आहेत. विशेषत: ग्रामीण भागात लक्ष देण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

केरळ पुनर्वसनासाठी शक्य ती मदत करणारसेवा भारतीच्या माध्यमातून घरांची डागडुजी, पुनर्वसन यासाठीदेखील संघाकडून मदत करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत केरळमध्ये ३०० मदत शिबिरांच्या मार्फत लाखो लोकांपर्यंत मदत पोहोचविली जात आहे. एक लाखाहून अधिक स्वयंसेवक मदतकार्याला लागले आहेत, अशी माहितीदेखील सूत्रांनी दिली.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघWaterपाणी