शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील प्रभाग निहाय “सखोल स्वच्छता मोहिमस” प्रारंभ; १ फेब्रुवारीपर्यंत चालणार मोहिम

By मंगेश व्यवहारे | Updated: January 24, 2024 15:44 IST

रस्ते स्वच्छतेबरोबर नाले, चेंबर्सची स्वच्छता व रस्त्यावरील दुभाजकाची दुरूस्तीही

मंगेश व्यवहारे, नागपूर: स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूरच्या दिशेने पाऊल टाकत नागपूर महानगरपालिकेद्वारा शहरातील प्रभागनिहाय “सखोल स्वच्छता मोहिम”ला सुरुवात करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे घेतलेल्या बैठकीत राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये “सखोल स्वच्छता मोहीम” राबविण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. येत्या १ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या मोहिमेत सर्व मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, चौक, फुटपाथ स्वच्छ करण्यात येणार आहे.

तसेच रस्त्यावर पाणी साचणार नाही याची खातरजमा करून फायरेक्स/डिस्लजिंग/वॉटर टँकर वापरून रस्ते साफ करण्यात येत आहे. मोहीमे दरम्यान निर्माण होणारा गाळ स्वतंत्रपणे गोळा करण्यात येत असून, रस्ते आणि पदपथावरील सर्व अतिक्रमणे काढण्यात येत आहे, स्वच्छता मोहीमेत कोणताही अडथळा येणार नाही या दृष्टीने रस्ते व रस्त्या लगतच्या जागा अतिक्रमण मुक्त करण्यात येत आहे. नियमित पार्किंगसाठी रस्त्यावर विषम/सम तारखेची पार्किंग सुरू करण्यात येत आहे. सर्व प्रभागात सीवरेज/स्ट्रॉर्म वॉटर ड्रेन (नाला)/वीज/टेलिफोन/ब्रॉडबँड चेंबर्स योग्य स्थितीत असल्याची खात्री करण्यात येत आहे. रस्ते दुभाजक दुरुस्त करण्यात येत आहेत आणि चांगल्या स्थितीत ठेवण्यात येत आहे, तसेच जेथे शक्य असेल तेथे सुशोभीकरण करण्यात येत आहे. फूटपाथ आणि मध्यभागावरील कर्ब स्टोन पूर्णपणे स्वच्छ करण्यात येत आहे. पान व गुटखा खाऊन फुटपाथवर/रस्त्यांवर थुंकलेली जागा स्वच्छ करण्यात येत आहे.

 मोहिमेत घ्यावा नागरीकांनी सहभाग

“सखोल स्वच्छता मोहिमेद्वारा सार्वजनिक आरोग्य सुधारेल, पर्यावरणाचे रक्षण होईल, नागरी भागामध्ये वाढत्या प्रदुषणाला आळा बसेल तसेच नागपूर, स्वच्छ सुंदर व स्वस्थ होईल असा विश्वास मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला आहे. तसेच नागरिकांनी देखील स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही डॉ. चौधरी यांनी केले आहे.[2:58 PM, 1/24/2024] +91 77220 67858: मंगेश व्यवहारे प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील कत्तलखाने बंदनागपूर : भारतीय ‘प्रजासत्ताक दिनानिमित्त’ २६ जानेवारी रोजी नागपूर शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याबाबत आदेश नागपूर महानगरपालिकेद्वारे जारी करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी महाराष्ट्र शासनाच्या दिशानिर्देशाच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशानुसार उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी यासंबंधी आदेश निर्गमित केले आहेत. शुक्रवार २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी शहरात कत्तलखाने व मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याच्या आदेशाचे उल्लंघन केल्यावर नागपूर महानगरपालिकेद्वारे कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर