शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात नवविवाहित पत्नीची अमानुष हत्या; पतीच्या अनैतिक संबंधांची परिणती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 14:49 IST

Nagpur News नागपुरात अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीची तिच्या पतीने अमानुष हत्या केली.

ठळक मुद्देएमआयडीसी परिसरात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर - अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीची तिच्या पतीने अमानुष हत्या केली. सोमवारी सकाळी या घटनेचे वृत्त एमआयडीसीतील भीमनगरात वाऱ्यासारखे पसरले. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली. दिप्ती अरविंद नागमोती (वय २६) असे मृत महिलेचे नाव असून तिची हत्या करून पसार झालेल्या आरोपीचे नाव अरविंद अशोक नागमोती (वय ३०) आहे.मुळचा चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेला आरोपी एमआयडीसीत कामाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेड्याच्या दिप्तीसोबत त्याचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. हे दोघे एमआयडीसीतील भीमनगरात भाड्याच्या खोलीत राहायचे. आरोपी अरविंद बाहेरख्याली वृत्तीचा आहे. लग्न झाल्यानंतरही तो त्याच्या प्रेयसीच्या संपर्कात होता. त्याचे अनैतिक संबंध दिप्तीला दोन आठवड्यांपूर्वी माहित झाले. त्यामुळे त्यांच्यात कडाक्याचा वाद निर्माण झाला. रोजच त्यांच्यात कटकटी होऊ लागल्या. अनैतिक संबंध तोडल्याशिवाय घरात यायचे नाही, असा पवित्रा दिप्तीने घेतल्याने रविवारी सकाळपासून या वादाने भलतेच वळण घेतले. दोघांपैकी कुणीच नमते घ्यायला तयार नसल्याने त्यांच्यात दिवसभर भांडण सुरू होते. दरम्यान, दिप्तीने काही दिवसांपूर्वी आपल्या माहेरच्यांनाही अरविंदच्या अनैतिक संबंधाची कल्पना दिली होती. त्यामुळे दोघांना समजावण्याच्या हेतूने दिप्तीचा भाऊ शुभम वामनराव ठाकरे (वय २०, रा. कुरखेडा), आरोपी अरविंदचे वडील आणि अन्य एक नातेवाईक रविवारी दुपारी नागपूरकडे निघाले.आणि शंका खरी ठरलीप्रवासादरम्यान शुभमने दिप्तीच्या मोबाईलवर वारंवार संपर्क केला. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याने त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आरोपीने तिचे काही बरेवाईट तर केले नसावे, असे त्याला वाटत होते. सोमवारी पहाटे १.२० च्या सुमारास शुभम आणि त्याचे दोन नातेवाईक आरोपी राहत असलेल्या घरी पोहचले. तेव्हा दारात पाय ठेवताच त्याची शंका खरी ठरली. दिप्ती पलंगावर पडून होती. तिच्या नाकातोंडातून रक्त वाहत होते. आरोपी अरविंद आजुबाजुला दिसत नव्हता. त्यामुळे शुभमने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. दिप्तीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी मृतदेह मेडिकलला रवाना केला. शुभमच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अरविंदचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Murderखून