शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अमानुष! हवी ती भाजी न मिळाल्याने नागपुरात जन्मदात्रीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 10:44 IST

घरात भाजीपाला नसल्यामुळे भाजी करून देण्यास नकार दिल्याने नागपुरात एका दारुड्याने त्याच्या वृद्ध आईची लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हत्या केली.

ठळक मुद्देदारुड्याने केला वांग्याच्या भाजीसाठी घातवृद्ध आईला लाथाबुक्क्यांनी ठार मारले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरात भाजीपाला नसल्यामुळे भाजी करून देण्यास नकार दिल्याने एका दारुड्याने त्याच्या वृद्ध आईची लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हत्या केली. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी ही थरारक घटना घडली. ममताबाई सदाशिवराव हिंगे (वय ६०) असे मृत वृद्धेचे नाव आहे, तर सोनू ऊर्फ मिलिंद सदाशिव हिंगे (वय ४५) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.सोमलवाड्यातील समृद्धी बौद्ध विहाराजवळ महात्मा फुले झोपडपट्टी आहे. तेथे सदाशिवराव हिंगे यांचे घर आहे. आरोपी सोनू हा त्यांचा मोठा मुलगा असून त्याचे दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज होते.काही वर्षांपूर्वी त्याला दारूचे व्यसन जडले. तो दारूच्या इतक्या आहारी गेला की कामधंदा सोडून तो दारूच्या नशेत टून्न होऊन राहायचा. गॅरेज बंद पडल्याने नंतर त्याने बायको आणि आईवडिलांच्या भरवश्यावर दारूचा शौक पूर्ण करणे सुरू केले. त्यासाठी तो रोजच बायकोला मारायचा. त्याच्या व्यसनाला कंटाळून चार वर्षांपूर्वी त्याची बायको त्याला सोडून गेली.तेव्हापासून तो वृद्ध आईवडिलांच्या कमाईवरच जगतो. त्याचे वडील सदाशिवराव सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात आणि कशीबशी दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था करतात. अनेकदा वेळेवर आणणे आणि वेळेवर खाणे, असेच चालते. शनिवारी सायंकाळी ५ च्या सुमारास टून्न होऊन आलेल्या आरोपी सोनूने त्याच्या आईला वांग्याची भाजी बनवून मागितली. घरात काहीच नसल्याने आईने भाजी बनवून देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपीने वृद्ध आईला लाथाबुक्कयांनी मारहाण सुरू केली. ती मदतीसाठी याचना करीत असताना या नराधमाने तिच्या डोक्यावर जाडजूड कवेलू आदळून तिला ठार मारले. आरडाओरड ऐकून शेजारी धावले. त्यांनी आरोपीला दूर केले.सोनेगाव पोलिसांना या घटनेची माहिती कळविण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक आर. एन. शेजव यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. वृद्ध ममताबाई यांना मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

पश्चात्ताप नाही !बाजूलाच राहणारी मृत ममताबार्इंची बहीण प्रतिभा चुन्नीलाल कुंभलकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला पोलिसांनी अटक केली. जन्मदात्रीची हत्या करूनही त्याला कसलाही पश्चाताप नसल्याचे त्याचे रात्रीपासूनचे पोलीस ठाण्यातील वर्तन आहे.

टॅग्स :Murderखून