शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

२४ तासात स्मार्ट सिटीच्या निर्णयाची माहिती द्या : महापौरांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 21:38 IST

कायद्यानुसार स्मार्ट सिटीतर्फे घेण्यात आलेले निर्णय किंवा केलेल्या कोणत्याही कामाची माहिती संचालकांना देणे बंधनकारक आहे. मात्र मागील सहा महिन्यापासून संचालकांना कुठलीही माहिती दिली नाही. स्मार्ट सिटी अंतर्गत घेण्यात आलेले निर्णय व केलेल्या कामाची माहिती आवश्यक कागदपत्रासह २४ तासात सादर करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी गुरुवारी दिले.

ठळक मुद्देसंचालक मंडळाच्या बैठकीत अधिकाऱ्यांची झाडाझडती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटीच्या कंपनी कायद्यानुसार महापौर, स्थायी समिती सभापती, सत्तापक्ष नेते, विरोधी पक्षनेते व सर्व गटनेते स्मार्ट सिटीचे संचालक आहेत. कायद्यानुसार स्मार्ट सिटीतर्फे घेण्यात आलेले निर्णय किंवा केलेल्या कोणत्याही कामाची माहिती संचालकांना देणे बंधनकारक आहे. मात्र मागील सहा महिन्यापासून संचालकांना कुठलीही माहिती दिली नाही. स्मार्ट सिटी अंतर्गत घेण्यात आलेले निर्णय व केलेल्या कामाची माहिती आवश्यक कागदपत्रासह २४ तासात सादर करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी गुरुवारी दिले.नागपूर स्मार्ट अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेड (एनएसएससीडीसीएल) च्या कामाचा महापौरांनी आढावा घेतला. तथा स्मार्ट सिटीचे ‘इन कॅमेरा’ झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. यावेळी स्मार्ट सिटीचे सर्व संचालक स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, बसपच्या गटनेत्या वैशाली नारनवरे उपस्थित होते. संपूर्ण बैठकीचे व्हिडिओ रेकर्डिंग करण्यात आले.यावेळी एनएसएससीडीसीएल चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे, महाव्यवस्थापक (मोबिलिटी) राजेश दुफारे, कंपनी सचिव अनुप्रिया ठाकूर, एच.आर.प्रमुख अर्चना अडसड, लेखाधिकारी अमृता देशकर, सोनाली गेडाम, विधी अधिकारी मंजित नेवारे, ई-गव्हर्नन्सचे महाव्यवस्थापक शील घुले आदी उपस्थित होते.शहराच्या विकासाच्या दृष्टीने नागपूर स्मार्ट अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेडची स्थापना करण्यात आली आहे. स्मार्ट सिटीमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये किंवा गडबड होऊ नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. येथे जर कोणतीही गडबड झाली तर त्यामुळे मनपाचे नाव बदनाम होईल, त्यामुळे नियमानुसार व शासनाच्या निर्देशाप्रमाणेच सर्वांची वागणूक असावी, अशी अपेक्षा यावेळी संदीप जोशी यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीSmart Cityस्मार्ट सिटी