शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

आवक वाढली; कांदे व बटाट्याचे दर उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 20:35 IST

Nagpur News Onion गेल्या आठवड्याच्या तुलनेत सध्या नवीन कांदे आणि बटाट्यांची आवक वाढल्याने कळमन्यात जुन्या लाल कांद्याचे (गुलाबी) भाव प्रति किलो ४० ते ४५ रुपयावरून २५ ते ३० आणि बटाटे ४० ते ४५ रुपयावर ३५ रुपयापर्यंत खाली आले आहेत.

ठळक मुद्देनवीन माल बाजारात छिंदवाडा बटाट्याची आवक

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : गेल्या आठवड्याच्या तुलनेत सध्या नवीन कांदे आणि बटाट्यांची आवक वाढल्याने कळमन्यात जुन्या लाल कांद्याचे (गुलाबी) भाव प्रति किलो ४० ते ४५ रुपयावरून २५ ते ३० आणि बटाटे ४० ते ४५ रुपयावर ३५ रुपयापर्यंत खाली आले आहेत. शेतकऱ्यांना भाव कमी मिळत आहे, पण दरकपातीचा ग्राहकांना फायदा होत आहे. किरकोळमध्ये ४० रुपये भाव आहे. भाव कमी झाल्याने पश्चिम महाराष्ट्रातील उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत.

कळमना आलू-कांदे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी म्हणाले, काही दिवसापूर्वी नाशिक, धुळे, अहमदनगर, औरंगाबादसह राजस्थान आणि मध्य प्रदेशात लाल कांद्याचे (डार्क लाल) पीक निघाले आहे. गेल्या दोन महिन्यापासून जुने कांदे (लाल) बाजारात विक्रीला होते. साठा कमी असल्याने भाव अचानक वाढून ४० ते ४५ रुपयावर पोहोचले होते. पण नवीन माल बाजारात येताच जुने कांदे २५ ते ३० रुपयावर खाली आले. पण कळमन्यात नवीन कांदे ३५ ते ४० रुपये आणि किरकोळमध्ये ४५ रुपये भाव आहे. कळमन्यात पांढऱ्या कांद्याचे भाव ५० ते ५५ रुपयावरून ४० ते ४५ रुपयापर्यंत उतरले आहेत. कर्नाटक आणि सोलापूर येथे पांढरा कांदा पावसामुळे खराब झाला आहे. सध्या धुळे येथून दररोज दोन ते तीन ट्रक येत आहेत. कळमन्यात दररोज एकूण २५ पेक्षा जास्त ट्रकची आवक आहे.

बटाटे १० रुपयांनी उतरले

 आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रात पुणे येथील बटाट्याचे नवीन पीक बाजारात आल्याने कळमन्यात बटाट्याचे भाव ४० ते ४५ रुपयावरून ३५ रुपयापर्यंत खाली आले आहेत. या ठिकाणचा माल कळमन्यात येत नसला तरीही कानपूर आणि आग्रा येथून मालाची जावक बंद झाली आहे. कानपूर आणि आग्रा येथून दररोज १५ ते १६ ट्रक जुन्या बटाट्याची आवक आहे. छिंदवाडा येथून दररोज एक ट्रक येत आहे. अलाहाबाद येथून पुढील महिन्यात माल येणे सुरू होईल. त्यानंतर भाव आणखी कमी होतील.

किरकोळमध्ये लसूण १५० रुपये

यंदा पावसामुळे माल खराब झाल्याने लसणाचे भाव वाढले. कळमन्यात दर्जानुसार ८० ते १२० रुपये किलो भाव आहेत. किरकोळमध्ये १५० रुपयापर्यंत विक्री होत आहे. सध्या मध्य प्रदेश आणि राजस्थान येथून दररोज दोन ट्रकची आवक आहे. नवीन लसूण बाजारात येण्यास आणखी दोन महिने लागतील, असे वसानी म्हणाले.

टॅग्स :onionकांदा