शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गुंडाचा खून

By admin | Updated: May 11, 2017 02:32 IST

यशोधरानगर येथे गुन्हेगारांमध्ये सुरू असलेल्या टोळीयुद्धात दिवसाढवळ्या एका प्रतिस्पर्धी गुंडाचा रस्त्यावरच खून करण्यात आला.

यशोधरानगरात टोळीयुद्ध : नागरिकांमध्ये भीती लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : यशोधरानगर येथे गुन्हेगारांमध्ये सुरू असलेल्या टोळीयुद्धात दिवसाढवळ्या एका प्रतिस्पर्धी गुंडाचा रस्त्यावरच खून करण्यात आला. बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. प्रवीण शंकर लांजेवार (२५) रा. कुंदनलाल गुप्तानगर असे मृताचे नाव आहे. आठवडाभरात खुनाची ही चौथी घटना घडल्याने पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न निर्माण झाले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून ते स्वत:ला असुरक्षित समजू लागले आहेत. खुनाची ही ताजी घटना बुधवारी दुपारी ३.३० वाजता यशोधरानगर पोलीस ठाणे हद्दीतील विटाभट्टी परिसरातील शितला माता चौकात घडली. मृत प्रवीण लांजेवार हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने १९ डिसेंबर २०१६ रोजी आपल्या साथीदाराच्या मदतीने पाचपावली येथे रवि सातपैसे नावाच्या गुंडाचा खून केला होता. उत्तर नागपुरात चालत असलेल्या खंडणी वसुलीसाठी हा खून करण्यात आला होता. पाचपावली पोलीस यात अपयशी ठरल्याने आरोपी थोड्या दिवसातच जामिनावर सुटले होते. ११ एप्रिल रोजी प्रवीण तुरुंगातून जामिनावर सुटला. बाहेर आल्यानंतर प्रवीण उत्तर नागपुरात आपला दबदबा बनवण्याची तयारी करीत होता. त्यामुळे परिसरातील गुन्हेगार शेर खान, बाबू आणि त्यांच्या साथीदारासोबत त्याचा वाद सुरू होता. त्यांच्यात काही दिवसांपासून टोळीयुद्ध भडकले होते. प्रवीणची गुन्हेगारांमध्ये चलती असल्याने शेर खान व बाबूने त्याला संपवण्याचा निश्चय केला. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी चर्चा करण्याच्या बहाण्याने बुधवारी दुपारी ३.३० वाजता प्रवीणला शितला माता मंदिराजवळ बोलावले. तिथे तो येताच त्याला घेरले, शस्त्रांनी त्याच्या शरीरावर वार करून त्याला जागीच संपविले. घटनेच्यावेळी चौकात खूप वर्दळ होती. अनेक लोकांनी खून होताचा पाहिला. परंतु गुंडांजवळ शस्त्र असल्याने कुणीही समोर येण्याची हिंमत दाखवू शकले नाही.