शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गुंड शेखूची प्रेमिका लागली हाती  : दोन साथीदारांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 00:28 IST

कुख्यात गुंड शेखूच्या प्रेमिकेसह तीन साथीदार पोलिसांच्या हाती लागले आहेत. प्रेमिकेने पोलीस आल्याची सूचना दिल्यामुळे शेखू साथीदारांसह फरार झाला.

ठळक मुद्देमनीषनगरात केली कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कुख्यात गुंड शेखूच्या प्रेमिकेसह तीन साथीदार पोलिसांच्या हाती लागले आहेत. प्रेमिकेने पोलीस आल्याची सूचना दिल्यामुळे शेखू साथीदारांसह फरार झाला. शेखूच्या साथीदारांकडून पिस्तुल आणि काडतूस जप्त करण्यात आले आहेत. अटक केलेले आरोपी स्नेहल सुधीर पीटर, शिवा ऊर्फ शिवप्रसाद मुरलीधर बेजनकिवार आणि आकाश उत्तम चव्हाण आहेत.शेख खुनाचा प्रयत्न तसेच हप्ता वसुलीच्या प्रकरणात पोलिसांना दोन महिन्यांपासून हवा होता. गुन्हे शाखेचे पोलीस त्याचा शोध घेत होते. पोलिसांना तो मनीषनगरच्या जयदुर्गा सोसायटीत प्रेमिका आणि साथीदारांसह राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शुक्रवारी सकाळी त्याच्या फ्लॅटवर धाड टाकली. शेखूने कुत्रे पाळले होते. पोलिसांना पाहून कुत्रे भुंकत होते. त्यांनी पोलिसांच्या मार्गात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी भिंत ओलांडून अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला. हे पाहून स्नेहलने शेखूला पोलीस आल्याची माहिती दिली. शेखू सूरज नावाच्या मित्रासोबत बाहेर गेला होता. तो फरार झाला. पोलिसांना फ्लॅटमध्ये स्नेहलसोबत शिवा आणि आकाश जाधव भेटले. पोलिसांनी अटक करताच स्नेहलने हंगामा केला. तिने कारवाईला विरोध केला. सूत्रांनुसार शेख काही दिवसांपासून येथे राहण्यास आला. त्याने नीलेश अग्रवाल नावाच्या व्यक्तीचा फ्लॅट किरायाने घेतला. स्नेहल अनेक दिवसापासून शेखूसोबत आहे. ती पूर्वीपासून चर्चेत आहे. शेखू भाजपा युवा मोर्चाचे तत्कालीन उपाध्यक्ष हेमंत दियेवारच्या खुनापासून चर्चेत आला. त्याने तीन वर्षांपूर्वी बजाजनगरच्या एका फ्लॅटवर ताबा घेतला होता. शेखूची पश्चिम नागपुरातही दहशत आहे. तो कोळसा आणि दारूच्या तस्करीतील मोठा गुन्हेगार आहे. त्याच्या गुन्ह्यांमुळे त्याच्या विरुद्ध मकोकाची कारवाई करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक