शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकाम केल्यास नगरसेवक होण्यास अपात्र; नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 06:40 IST

या पूर्णपीठात न्या. झेड. ए. हक, न्या. विनय देशपांडे व न्या. अमित बोरकर यांचा समावेश होता. कलम १० (१-डी) मध्ये संबंधित तरतूद करण्यामागे, अनधिकृत बांधकामावर अंकुश ठेवणे हा  कायदे मंडळाचा उद्देश आहे.

नागपूर : महानगरपालिका सदस्य (नगरसेवक), सदस्याची पत्नी किंवा पती आणि सदस्यांवर अवलंबून असलेली व्यक्ती यापैकी कुणीही निवडणुकीच्या आधी अनधिकृत बांधकाम केले असले तरीदेखील संबंधित महानगरपालिका सदस्य, महाराष्ट्र महानगरपालिका कायदा-१९४९ मधील कलम १० (१-डी) अंतर्गत अपात्र ठरतो, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील तीन सदस्यीय पूर्णपीठाने मंगळवारी दिला. 

या पूर्णपीठात न्या. झेड. ए. हक, न्या. विनय देशपांडे व न्या. अमित बोरकर यांचा समावेश होता. कलम १० (१-डी) मध्ये संबंधित तरतूद करण्यामागे, अनधिकृत बांधकामावर अंकुश ठेवणे हा  कायदे मंडळाचा उद्देश आहे. त्यामुळे संबंधितांनी अनधिकृत बांधकाम निवडणुकीपूर्वी केले की निवडणुकीनंतर, त्याने फरक पडत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले तसेच, मालमत्तेचा मालकी हक्क मिळण्यापूर्वी, भाड्याच्या परिसरात आणि अतिक्रमण केलेल्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केले तरीही महानगरपालिका सदस्य अपात्र ठरतात, असे न्यायालयाने म्हटले. न्यायालयाने या निर्णयाद्वारे चार वादग्रस्त मुद्द्यांवर उत्तरे दिली आहेत. त्यापैकी हे एका मुद्द्यावरील उत्तर आहे. नगरसेवक निवडणुकीपूर्वीच अपात्र असल्यास दाद मागता येते हा आधीचा निर्णय पूर्णपीठाने चुकीचा ठरविला.

...या परिस्थितीत अपात्र ठरत नाहीमहानगरपालिका सदस्य (नगरसेवक), सदस्याची पत्नी किंवा पती आणि सदस्यावर अवलंबून असलेली व्यक्ती यांना सोडून इतर व्यक्तीने अनधिकृत बांधकाम केले असेल आणि मालमत्ता महानगरपालिका सदस्याने संपादित केली असेल तर, या परिस्थितीत महानगरपालिका सदस्य अपात्र ठरत नाही, असे न्यायालयाने दुसऱ्या मुद्द्यांचे उत्तर देताना स्पष्ट केले.  महानगरपालिका सदस्य (नगरसेवक), सदस्याची पत्नी किंवा पती आणि सदस्यावर अवलंबून असलेली व्यक्ती यांना सोडून इतर व्यक्तीने अनधिकृत बांधकाम केले असेल आणि मालमत्ता महानगरपालिका सदस्याने संपादित केली असेल तर, या परिस्थितीत महानगरपालिका सदस्य अपात्र ठरत नाही, असे न्यायालयाने दुसऱ्या मुद्द्यांचे उत्तर देताना स्पष्ट केले.