शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर ‘एमआयडीसी’च्या १४७ भूखंडांवरील उद्योग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 22:10 IST

नागपूर ‘एमआयडीसी’ परिसरात असलेल्या एकूण औद्योगिक भूखंडांपैकी १४७ ठिकाणचे उद्योग मागील १५ महिन्यांमध्ये बंद पडले आहेत. यातील ४० बंद उद्योगांना ‘एमआयडीसी’तर्फे नोटीस पाठविण्यात आली आहे. मात्र इतर १०७ उद्योगांवर काय कारवाई करण्यात आली हा प्रश्न कायम आहे. माहितीच्या अधिकारातून बंद उद्योगांची ही बाब समोर आली आहे.

ठळक मुद्दे१५ महिन्याची आकडेवारी : ४० बंद उद्योगांना ‘एमआयडीसी’ची नोटीस : बंद उद्योगांची यादीच उपलब्ध नाही

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर ‘एमआयडीसी’ परिसरात असलेल्या एकूण औद्योगिक भूखंडांपैकी १४७ ठिकाणचे उद्योग मागील १५ महिन्यांमध्ये बंद पडले आहेत. यातील ४० बंद उद्योगांना ‘एमआयडीसी’तर्फे नोटीस पाठविण्यात आली आहे. मात्र इतर १०७ उद्योगांवर काय कारवाई करण्यात आली हा प्रश्न कायम आहे. माहितीच्या अधिकारातून बंद उद्योगांची ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी ‘एमआयडीसी’कडे माहिती अधिकार कायद्यांतर्गत विचारणा केली होती. १ जानेवारी २०१७ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत नागपूर ‘एमआयडीसी’तील किती उद्योग बंद पडले, बंद उद्योगांवर काय कारवाई करण्यात आली, ‘एमआयडीसी’च्या माध्यमातून सरकारला किती महसूल मिळाला, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ‘एमआयडीसी’मध्ये एकूण १६७३ भूखंड आहेत. यातील ४४ भूखंड रिकामे आहेत. एकूण संख्येपैकी १३७० औद्योगिक भूखंड आहेत. सद्यस्थितीत यातील ११५२ भूखंडांवर उद्योग सुरू आहेत. १ जानेवारी २०१७ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत एकूण १४७ भूखंडांवरील उद्योग बंद पडले. यातील ४० बंद उद्योगांना ‘एमआयडीसी’तर्फे नोटीस बजावण्यात आली आहे. दोन उद्योगांविरोधात न्यायालयीन खटले सुरू आहेत. दरम्यान, या कालावधीत सरकारला ‘एमआयडीसी’पासून ५ कोटी ७३ लाख ७५ हजार ३३६ रुपयांचा महसूल प्राप्त झाला.बंद उद्योगाचंी यादी कुणाकडे ?आश्चर्याची बाब म्हणजे ‘एमआयडीसी’च्या भूखंडांवर बंद पडलेल्या उद्योगांची कुठलीही यादी प्रशासनाकडे उपलब्ध नाही. माहितीच्या अधिकारात तसे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. जर ‘एमआयडीसी’कडे बंद पडलेल्या उद्योगांची यादी नाही, तर ती आहे कुणाकडे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसीnagpurनागपूर