शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
4
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
5
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
6
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
7
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
8
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
9
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
10
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
11
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
12
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
13
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
14
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
15
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
16
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
17
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
18
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
19
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
20
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील उद्योगांना नवीन ऑर्डरची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 11:48 IST

मोठ्या उद्योगांकडून लघुउद्योगांना ऑर्डर मिळणे बंद झाले आहे. स्थिती सुरळीत होण्यासाठी उद्योगांना आता नवीन ऑर्डरची प्रतीक्षा असल्याचे मत उद्योजकांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे राज्यांमध्ये उद्योगांसाठी सारखे नियम नाहीत; आर्थिक चक्र मंदावले

मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनलॉकमध्ये उद्योजकांनी उत्साहाने उद्योग सुरू केले होते; पण ऑर्डर नसल्याने अनेक औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांनी उत्पादन कमी केले तर काहींनी उद्योग बंद केले आहेत. संपूर्ण देशात उद्योगांची स्थिती सुरळीत नसल्याने मोठ्या उद्योगांकडून लघुउद्योगांना ऑर्डर मिळणे बंद झाले आहे. स्थिती सुरळीत होण्यासाठी उद्योगांना आता नवीन ऑर्डरची प्रतीक्षा असल्याचे मत उद्योजकांनी व्यक्त केले.

लॉकडाऊनपूर्वी नागपूर जिल्ह्यात जवळपास २९०० उद्योग सुरू होते. त्यानंतर सर्वच उद्योगांनी नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी घेतली. त्यातील जवळपास २५५० उद्योग सुरू झाले. सध्या ४५ ते ५० टक्के उद्योग ५० ते ६० टक्के क्षमतेने सुरू आहेत. जूनच्या अखेरच्या आठवड्यापासून औद्योगिक क्षेत्राकडून विजेची मागणी कमी झाली. ही मागणी जुलैमध्ये फार कमी झाली आहे. उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. सामाजिक चक्रानंतर आर्थिक चक्र चालते. पण सध्या उद्योगांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. लघुउद्योगांचे सर्वात जास्त हाल होत असल्याचे उद्योजकांनी सांगितले.

कामगारांना पगार देणे कठीणउद्योगांना ऑर्डर मिळाल्यास कंत्राटी पद्धतीने आठवड्यासाठी कामगार कामावर ठेवावे लागतात. ऑर्डर तीन दिवसात पूर्ण झाली तर कामगारांना आठवड्याचा पगार द्यावा लागतो. सध्या मालाला उठाव नसल्याने कुणीही उद्योजक ऑर्डरविना उत्पादनाचा अतिरिक्त साठा करण्यास तयार नाही. हिंगणा आणि बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात इंजिनिअरिंग मालाचे जास्त उत्पादन होते. पण सध्या इंजिनिअरिंग उत्पादनांना फारच कमी मागणी आहे. उत्पादनांना मागणी येण्यास आणखी काही महिने लागणार आहे. त्यानंतरच स्थिती सुरळीत होईल, असे उद्योजकांनी स्पष्ट केले.

आर्थिक घडी सुरळीत होण्याची अपेक्षाराज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात प्रशासनाचे नियम सारखे नाहीत. राज्य शासनाचे प्रशासनावर नियंत्रण नाही. स्थानिक प्रशासन उद्योगधंदे बंद करण्यातच धन्यता मानत आहे. त्यामुळे महसूल संकलनावर परिणाम झाला आहे. विजेची मागणी ५० टक्क्यांवर आली आहे. कारखाना सुरू ठेवायचा की नाही, असे प्रश्न उद्योजकांसमोर उभे राहिले आहेत.कोडे सुटताना दिसत नाही. जास्त उत्पादनाचा साठा करून काय करणार, असा प्रश्न उद्योजकांसमोर आहे. त्यामुळे उद्योग पुन्हा काही दिवस बंद करण्यावर उद्योजकांचा भर दिसून येत आहे. घडी सुरळीत झाल्यानंतर आणि मागणी वाढल्यानंतरच उद्योगांना सुगीचे दिवस येतील, असे मत बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष मिलिंद कानडे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :businessव्यवसाय