शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहरातील उद्योग, आस्थापनांना सामाजिक अंतराचे नियम पाळणे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 12:10 IST

लॉकडाऊनदरम्यान २० एप्रिलपासून काही उद्योग, आस्थापना सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारने १७ एप्रिल रोजी एकत्रित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनदरम्यान २० एप्रिलपासून काही उद्योग, आस्थापना सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारने १७ एप्रिल रोजी एकत्रित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. लॉकडाऊन कालावधीत राज्य सरकारने विहित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार संबंधितांकडून संपूर्ण अटी व शर्तींचे पालन होत असेल तरच मनपा आयुक्त त्यासंदर्भातील अनुषंगिक परवानगी देतील. यासंदर्भात अर्ज करताना संबंधित आस्थापनेची कार्यप्रणाली कशी असेल, किती कर्मचारी उपस्थित राहतील, त्यांच्या बसण्याची व्यवस्था करताना सामाजिक अंतर पाळले जात आहे की नाही, सॅनिटायझेशनची काय व्यवस्था असेल आदींचा स्पष्ट उल्लेख अर्जात असायला हवा. अनुज्ञेय उद्योग सुरू करताना तेथपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना प्रवासाची परवानगीकरिता कर्मचाऱ्यांना ‘ट्रॅव्हल पास’ मनपा आयुक्तांकडून घ्यावी लागेल.प्रतिबंधित क्षेत्रात शिथिलता नाहीनागपूर महानगरपालिकेतील जे क्षेत्र कोविड-१९ चे रुग्ण आढळल्यामुळे मनपा आयुक्तांनी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे, त्या क्षेत्रात मात्र सदर उद्योग, आस्थापनांना शिथिलता अनुज्ञेय राहणार नाही. अर्थात कोरोनाचे रुग्ण आढळलेले जे क्षेत्र मनपा आयुक्तांनी सील केलेले आहेत, त्या क्षेत्रातील वरीलपैकी कुठल्याही सदर कामांना परवानगी मिळणार नाही अथवा भविष्यात नव्याने कोरोना रुग्ण आढळले तर रुग्ण ज्या क्षेत्रातील असेल ते क्षेत्र प्रतिबंधित म्हणून घोषित करण्यात येईल. तेथील कुठल्याही उद्योगांना, आस्थापनांना तात्काळ प्रभावाने लॉकडाऊन कालावधीत व्यवसाय करण्यासंदर्भातील परवानगी रद्द करण्याचे अधिकार मनपा आयुक्तांना राहतील. सद्यस्थितीत महानगरपालिकेच्या एकूण १० झोनपैकी गांधी-महाल, सतरंजीपुरा, आसीनगर, मंगळवारी व धरमपेठ या झोनमधील संबंधित काही क्षेत्र हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे सदर क्षेत्रात सदर शिथिलतम उद्योग, व्यवसायांना परवानगी अनुज्ञेय असणार नाही.अशी राहतील मार्गदर्शक तत्त्वेउद्योग, आस्थापना व शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्यासाठी परवानगी हवी आहे त्यासाठी पुढीलप्रकारे मार्गदर्शक तत्त्वे (एसओपी) राहतील.संबंधित आस्थापनेच्या संपूर्ण क्षेत्राचे निर्जंतुकीकरण करणेकर्मचाºयांसाठी कंपनीतर्फे सामाजिक अंतर पाळून प्रवास व्यवस्था करणेथर्मल स्कॅनिंग करणेलिफ्टचा कमीतकमी वापर करणेगुटखा, तंबाखू आणि थुंकण्यावर निर्बंधकामाच्या दोन पाळ्यांमध्ये एक तासाचे अंतर असावेपरवानगीसाठी मनपात विशेष कक्षसंबंधित आदेशानुसार घ्यावयाच्या परवानगीसाठी विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावा लागेल. नागपूर महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात यासाठी विशेष कक्ष सुरू करण्यात येत आहे. संबंधितांनी सादर केलेल्या अर्जाची संपूर्ण पडताळणी केल्यानंतरच योग्य वाटल्यास आणि नियमांची पूर्तता करणाºया अर्जांनाच परवानगी देण्यात येईल.लॉकडाऊन सुरूच राहणारकाही अटी-शर्तींच्या आधारे परवानगी देण्यात येत असली तरी लॉकडाऊन ३ मेपर्यंत कायमच राहील. या सर्व सेवातील व्यक्ती, वाहन ज्यांना मनपा आयुक्तांतर्फे परवानगी आहे, अशांनाच फक्त संबंधित ठिकाणी जाता येईल. इतरांना घरातच राहायचे आहे. लॉकडाऊनदरम्यान पाळावयाचे नियम पाळायचेच आहेत. या काळात राज्य सरकारच्या सूचनांचे जे लोक उल्लंघन करतील, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस