काँग्रेसतर्फे जयंती साजरी : देवडिया भवनात मुख्य कार्यक्रमनागपूर : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. सामान्य जनतेला न्याय मिळावा यासाठी त्यांनी विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या. त्यांच्या रुपात देशाला एक कणखर नेतृत्त्व मिळाले होते, असे मत व्यक्त करीत काँग्रेस नेत्यांनी इंदिरा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली.देवडिया काँग्रेस भवनात इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी अध्यक्ष विकास ठाकरे होते. माजी मंत्री अनिस अहमद, रामगोविंद खोब्रागडे, तानाजी वनवे, नगरसेवक प्रशांत धवड, रेखा बाराहाते, सरस्वती सलामे, संजय दुबे, अतुल कोटेचा, बंटी शेळके, प्रज्ञा बडवाईक आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी ठाकरे यांनी २८ डिसेंबरला काँग्रेसच्या स्थापना दिनी काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा सत्कार केला जाणार असल्याचे जाहीर केले. या प्रसंगी पॅरीसमधील दहशतवादी हल्ल्यात मृतू झालेल्या नागरिकांना तसेच सिमेवर दहशतवाद्यांचा सामना करतना शहीद झालेले कर्नल संतोष महाडिक यांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.संचालन गजराज हटेवार यांनी केले. तुफैल अशर यांनी आभार मानले. या वेळी किशोर जिचकार, नगरसेविका सुजाता कोंबाडे, निमिषा शिर्के, राजू व्यास, बंडोपंत टेंभुर्णे, कमलेश समर्थ, अजय हिवरकर, राजू महाजन, संदेश सिंगलकर, परमेश्वर राऊत, संध्या ठाकरे, आकाश तायवाडे आदी उपस्थित होते. काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागातर्फे मध्य नागपूर गार्ड लाईन येथे अध्यक्ष ओवेस कादरी यांच्या अध्यक्षतेखाली आदरांजली अर्पण करण्यात आली. या वेळी सय्यद मुमताज, जावेद पठाण, इमरान अन्सारी आदी उपस्थित होते. काँग्रेसच्या विमुक्त -भटक्या जाती सेलचे अध्यक्ष मोहनीश जबलपुरे यांच्या अध्यक्षतेखाली धंतोली येथे वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी सचिन यादव, अनिकेत खोब्रागडे, राहुल खंडाळे, सुभाष अतकरे, उमेश राऊत, नीलेश बाबुळकर, संदीप यादव आदी उपस्थित होते. मध्य नागपूर ब्लॉक काँग्रेस कमिटी १७ तर्फे माजी नगरसेवक इब्राहिम भाई चुडीवाले यांच्या अध्यक्षतेखाली जयंती साजरी करण्यात आली. या वेळी अब्दुल अजीज पटेल, अप्पा मोहिते, साहेबराव देशमुख, कुणाल दहिवाले, मोहम्मद रफिक सौदागर, अब्दुल सलीम, अब्दुल तौफिक उपस्थित होते. काँग्रेस सेवादलाचे मुख्य संघटक रामगोविंद खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली आदरांजली अर्पण करण्यात आली. या वेळी सुलभा नागपूरकर, स्मिता कुंभारे, बबनराव दुरुगकर, कल्पना बांगरे, विठ्ठलराव दांडेकर, फुलवंती साखरे, सुमन माटे आदी उपस्थित होते. उत्तर नागपूर काँग्रेस समितीतर्फे बेझनबाग येथील कार्यालयात इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. माजी मंत्री नितीन राऊत यांच्याहस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. संचालन सुभाष मसराम यांनी केले. प्रास्ताविक शेषराव वासनिक यांनी केले. या वेळी मिलिंद सोनटक्के, खुशाल हेडाऊ, सिंधु उइके, हिरा गेडाम, गीता श्रीवास, संजय दुबे, विजयालक्ष्मी हजारे, किरण यादव, असरद खान, पंकज सावरकर, माटे, नामदेव भिसीकर, पुंडलिक मेश्राम आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
इंदिराजींनी कल्याणकारी योजना दिल्या
By admin | Updated: November 20, 2015 03:16 IST