शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

इंडिगोची नागपूर-भुवनेश्वर नवीन विमानसेवा १७ पासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 21:39 IST

इंडिगो एअरलाईन्सची नागपूर-भुवनेश्वर विमानसेवा १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या मार्गावर विमान सेवा सुरू करण्याची ग्राहकांची मागणी आता पूर्ण झाली आहे. ही सेवा नागपुरातून पहिल्यांदा सुरू होणार असून यापूर्वी दिल्ली, मुंबई, पुणे आणि बेंगळुरू विमानसेवाचा फायदा प्रवाशांना होत आहे.

ठळक मुद्दे नागपुरातून चार दिवस उड्डाण : नागपूर-हैदराबाद २० तर नागपूर-अहमदाबाद विमानसेवा २१ पासून

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंडिगो एअरलाईन्सची नागपूर-भुवनेश्वर विमानसेवा १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या मार्गावर विमान सेवा सुरू करण्याची ग्राहकांची मागणी आता पूर्ण झाली आहे. ही सेवा नागपुरातून पहिल्यांदा सुरू होणार असून यापूर्वी दिल्ली, मुंबई, पुणे आणि बेंगळुरू विमानसेवाचा फायदा प्रवाशांना होत आहे.इंडिगोचे ६ई १५८ हे विमान सकाळी ११ वाजता नागपुरातून रवाना होईल आणि दुपारी १२.३५ वाजता भुवनेश्वरला पोहचेल तर भुवनेश्वरहून ६ई १५९ हे विमान दुपारी १.१५ वाजता रवाना होऊन नागपुरात २.५० वाजता येईल आणि ३.४५ वाजता रवाना होईल. या विमानाचा मार्ग नागपुरातून भुवनेश्वर आणि भुवनेश्वरहून अहमदाबाद तसेच अहमदाबाद-भुवनेश्वर आणि भुवनेश्वर-नागपूर असा राहणार आहे. ही सेवा सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार अशी चार दिवस सुरू राहील.याशिवाय इंडिगोची नागपूर-हैदराबाद उड्डाण २० ऑगस्टपासून सुरू होणार आहे. हैदाराबादचे ६ई ७७४५ विमान हैदराबादहून सकाळी ६.२० वाजता उड्डाण भरून ८.०५ वाजता नागपुरात पोहचेल आणि नागपुरात ६ई ७७४६ विमान सकाळी ८.३५ वाजता रवाना होऊन १०.२० वाजता पोहचेल. ही सेवा मंगळवार, गुरुवार आणि शनिवार अशी तीन दिवस राहील.तसेच इंडिगोची अहमदाबाद-नागपूर विमान सेवा २१ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ६ई १५८ विमान अहमदाबादहून सकाळी ८.३० वाजता उड्डाण घेऊन सकाळी १० वाजता नागपुरात आणि ६ई १५९ विमान नागपुरातून दुपारी ३.५० वाजता उड्डाण भरून सायंकाळी ५.२० वाजता अहमदाबादला पोहोचणार आहे. ही सेवा सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार अशी चार दिवस राहील.१५ ऑगस्टला नागपुरातून इंडिगोची सहा आणि एअर इंडियाचे एक असे सात विमाने उड्डाण भरणार आहेत. यामध्ये दोन विमाने मुंबई, तीन दिल्ली, एक पुणे आणि एक बेंगळुरु असे शेड्युल आहे.

टॅग्स :Indigoइंडिगोnagpurनागपूर