शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पोलिसांकडून बेफिकिरी : धोक्याची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 20:40 IST

अनेकांना बाधित करून दोन आठवड्यांपूर्वी शहर पोलीस दलात खळबळ उडवून देणाऱ्या कोरोनापासून पोलीस धडा घ्यायला तयार नाहीत. त्यांची बेफिकिरी जागोजागी दिसून येत आहे. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देकोरोनाची भीती नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेकांना बाधित करून दोन आठवड्यांपूर्वी शहर पोलीस दलात खळबळ उडवून देणाऱ्या कोरोनापासून पोलीस धडा घ्यायला तयार नाहीत. त्यांची बेफिकिरी जागोजागी दिसून येत आहे. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे लॉकडाऊन करण्यात आले. नागरिकांनी सुरक्षित राहावे आणि कोरोनाचा सर्वत्र प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पोलिसांनी चांगले परिश्रम घेतले. छातीची ढाल बनवून रखरखत्या उन्हात पोलीस सर्वत्र आढळत होते. मात्र, आता पोलीसच बेफिकिरीने वागत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी पोलीस फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. एकमेकांना खेटून पोलीस उभे दिसतात. सक्करदरा चौक, बेझनबाग, इतवारीसह अनेक ठिकाणी हे चित्र दिसून येते. काही ठिकाणी तर पोलीस विना मास्कनेच वावरत असल्याचे दिसतात.शहर पोलीस दलातील ७ कर्मचारी आणि त्यांचे तीन नातेवाईक असे एकूण १० जण बाधित झालेले आहेत. तर, त्यांच्या संपर्कातील २८५ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तरीसुद्धा पोलिसांकडून ही बेफिकिरी दाखविणे सुरू आहे. त्यांच्यासाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी ती धोक्याची घंटा ठरू शकते. या संबंधाने पोलीस इस्पितळाचे प्रमुख डॉ. संदीप शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग व्हावे, पोलीस ठाण्यात बसताना व्यवस्थित अंतर ठेवावे, तक्रारी अथवा तपासाची कागदपत्रे हाताळताना ग्लोव्हज घालावेत, अशा सूचना देण्यात आल्याचे सांगितले आहे.होत असलेल्या उपाययोजनापोलिसांना व्हिटॅमिन, सी, डी आणि अन्य आवश्यक औषध दिले जात आहे. नियमित तपासणी करून सूचनांचे पालन होत आहे की नाही, त्यावर लक्ष ठेवले जात आहे. गर्दीच्या ठिकाणी, बंदोबस्तावर असताना मास्क, सॅनिटायझरचा वापर आवश्यक करण्यात आल्याचेही डॉ. शिंदे यांनी सांगितले.बेफिकिरी केली जात असेल तर ते चांगले नाही. पोलिसांना खबरदारी घेण्याचे निर्देश दिले जात आहेत.डॉ. भूषणकुमार उपाध्यायपोलीस आयुक्त, नागपूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNagpur Policeनागपूर पोलीस