शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

विदर्भात मान्सून उशिरा पोहचण्याचे संकेत

By admin | Updated: May 15, 2014 19:44 IST

नागपूर : मे महिना चांगला तापला तर मान्सून वेळेत येण्याची शक्यता असते. परंतु यावेळी मे महिन्यात तापमान ४४ अंशाच्या पुढे गेलेले नाही. त्यामुळे यंदा मान्सून विदर्भात उशिरा पोहचण्याचे संकेत आहे.यंदा पावसाचे सरासरी प्रमाण कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने यापूर्वी वर्तविला आहे. गेल्या वर्षी २३ मे रोजी तापमानाचा उच्चांक गाठला होता. ...

नागपूर : मे महिना चांगला तापला तर मान्सून वेळेत येण्याची शक्यता असते. परंतु यावेळी मे महिन्यात तापमान ४४ अंशाच्या पुढे गेलेले नाही. त्यामुळे यंदा मान्सून विदर्भात उशिरा पोहचण्याचे संकेत आहे. यंदा पावसाचे सरासरी प्रमाण कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने यापूर्वी वर्तविला आहे. गेल्या वर्षी २३ मे रोजी तापमानाचा उच्चांक गाठला होता. नागपूर शहरात ४७.९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली होती. सलग २४ दिवस तापमान ४४ अंशाच्या पुढे होते. त्यामुळे मान्सूनचे लवकर आगमन झाले होते. पावसाळा चांगला झाला होता. २०११ या वर्षान तीन दिवस तर २००४ मध्ये ५ दिवस तापमान ४४ अंशाच्या पुढे होते. मात्र यावर्षी मे महिन्यातील तापमान अद्याप ४४ अंश सेल्सियसच्या पुढे गेलेले नाही.दरवर्षी विदर्भात मान्सून १० जूनच्या आसपास दाखल होतो. परंतु यंदा तो १५ दिवस उशिरा पोहचण्याची चिन्हे आहेत. नोंदीनुसार ४ मे १९१७ रोजी सर्वात कमी १९.४ अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले होते. मागील काही दिवसापासून विदर्भात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. पावसाच्या हलक्या सरी आल्या. १.८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. तापमान ३९.२ अंश सेल्सियसपर्यंत खाली आले. अमरावती ४१.२ व ब्रम्हपुरी येथे ४१.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भातील इतर जिल्ह्यात तापमान ४०अंश सेल्सियसच्या खालीच होते. (प्रतिनिधी)