शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

भारतातील पहिली ट्रान्सवुमन नर्स; मायरा गुप्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 07:00 IST

मायरा गुप्ता. भारतातील पहिली ट्रान्सवुमन वर्किंग स्टाफ नर्स. शिक्षणाने प्रगतीची महाद्वारे खुली होतात याचं अलिकडचं ताजं उदाहरण.

ठळक मुद्देआईने दिलेला सल्ला मानलाट्रान्सजेंडरबाबत समाजधारणांमध्ये बदल व्हावा

वर्षा बाशूलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:

जी सध्या हैदराबादमधील एका मोठ्या हॉस्पीटलमध्ये आॅपरेशन थिएटरमधील तांत्रिक सहकर्मी म्हणून जबाबदारी सांभाळते आहे.मूळची नागपूरची असलेली मायरा गेल्या काही महिन्यांपूर्वी कायदेशीररित्या मायरा आर. गुप्ता झाली आहे. त्याआधी ती विक्रम रामचंद्र गुप्ता होती. बहुतांश तृतीयपंथियांच्या वाट्याला येतात ते बरेवाईट, कडू अनुभव तिनेही पाहिले आहेत. पण मायराच्या बाबतीत एक वेगळेपण अजून होतं. या वेगळेपणाने तिला इतर तृतीयपंथियांपासून वेगळ््या स्थानावर नेऊन ठेवलं. तो म्हणजे तिचा सेवाभावी स्वभाव आणि शिक्षणाची आवड. दुसरं म्हणजे तिची आई तिच्या पाठिशी भक्कमपणे उभी होती. तुला जे आवडतं ते काम तू कर असा आईचा तिला सल्ला होता. दरम्यानच्या काळात तिने विक्रम ते मायरा हा प्रवासही पूर्ण केला होता.बारावीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर पुढे काय करायचं हा प्रश्न होता. तिने मग सी.पी. अ‍ॅन्ड बेरार महाविद्यालयात मानसशास्त्रात बी.ए. केलं. ते झाल्यावर घरचे, जवळपासचे आणि मित्रमंडळ यांना सदैव मदतीला तयार असलेली, आजारी लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहणारी मायरा साहजिकच वैद्यकीय क्षेत्राकडे वळली. आॅरेंज सिटी हॉस्पीटलमध्ये वॉर्डबॉय म्हणून कामाला लागली. तिथे एक वर्षाचा आॅपरेशन थिएटर टेक्निकल असिस्टंट हा कोर्स केला. हॉस्पीटलमध्ये तिथे आपल्या कार्यशैलीने तिने सर्वांवर चांगली छाप उमटविली. तिच्या या गुणवैशिष्ट्याला हेरून वरिष्ठांनी तिला नर्सिंगचा कोर्स करण्याचा सल्ला दिला आणि मायरा त्यासाठी बंगरुळूला रवाना झाली. तीन वर्षांचा नर्सिंगचा कोर्स पूर्ण करून २०१८ मध्ये मायरा तेथीलच एका हॉस्पीटलमध्ये रुजू झाली. तिला अलीकडेच हैदराबाद येथील एका मोठ्या रुग्णालयात काम करण्याची संधी मिळाली आहे. राहण्यासाठी रुग्णालयाने एक सदनिकाही दिली आहे आणि तिच्या जाण्यायेण्यासाठी वाहनव्यवस्थाही करून दिली आहे.नर्सिंगचे शिक्षण घेतलेल्या एक दोन ट्रान्सवुमन्स देशात आहेत पण त्या नोकरी करत नाहीयेत असं मायरा सांगते. याअर्थाने ती भारतामधील पहिली वर्किंग ट्रान्सवुमन नर्स झाली आहे. नर्सिंगच्या क्षेत्रात काम करताना आपण अतिशय समाधानी व आनंदी आहोत, असे मायराचे सांगणे आहे. तिच्याच शब्दात सांगायचं झालं तर, ज्या क्षेत्रात आदर, सेवाभाव आणि मित्रता आहे तिथे काम करणे हे एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे.माझं व्यक्तिगत आयुष्य किंवा ट्रान्सवुमन असणं आणि प्रोफेशनल क्षेत्र याची सरमिसळ मी करत नाही. जेव्हा मी काम करत असते तेव्हा मी फक्त तेथील एक जबाबदार नर्स असते. ट्रान्सजेंडरचे आयुष्य म्हणजे केवळ टाळ््या वाजवणे, गाणी म्हणणे एवढेच मर्यादित राहिलेले नाही, जग बदलले आहे, समाजही बदलतो आहे. त्यामुळे आपणही बदलले पाहिजे. नव्या जगाच्या नव्या वाटांवरून वाटचाल करायला पाहिजे. नर्स बनण्याचे मायराचे एक स्वप्न तर पूर्ण झाले. तिचे दुसरे स्वप्न एका समंजस जोडीदाराचे आहे. त्याची पूर्ती व्हावी अशी मायराला लोकमततर्फे शुभेच्छा!

टॅग्स :Transgenderट्रान्सजेंडर