शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

पीओके घेण्यासाठी भारताला सुनियोजित अस्त्रांचा वापर करावा लागेल : कॅप्टन आलोक बन्सल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 22:52 IST

पीओके घेणे मुळीच कठीण नाही. मात्र, ते घेण्यासाठी शस्त्रांऐवजी सुनियोजित अस्त्रांचा वापर करण्यासाठीची आयडॉलॉजी भारताला अंगीकारावी लागेल.

ठळक मुद्देपरस्परविरुद्ध रॅडिकल आयडॉलॉजीनेच मात द्यावी लागेलगिलगीट-बाल्टिस्तानसाठी भारताने पाकिस्तानचे तत्त्व अंगीकारावे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १९७१च्या भारत-पाक युद्धात भारताने पाक अधिकृत काश्मीरचा ८०४ किलो मीटर प्रदेश भारतात सामील केला. आता तर भारताची राजकीय इच्छाशक्तीही प्रबळ आहे. त्यामुळे, पीओके घेणे मुळीच कठीण नाही. मात्र, ते घेण्यासाठी शस्त्रांऐवजी सुनियोजित अस्त्रांचा वापर करण्यासाठीची आयडॉलॉजी भारताला अंगीकारावी लागेल. त्या दृष्टीने थिंकटँकने विचार करणे अभिप्रेत असल्याचे चिंतन सेवानिवृत्त नौसैनिक व नवी दिल्ली येथील इंडिया फाऊंडेशन व सेंटर फॉर सिक्युरिटी अ‍ॅण्ड स्ट्रॅटेजीचे संचालक कॅप्टन आलोक बन्सल यांनी आज येथे मांडले.जम्मू काश्मीर स्टडी सेंटरच्या नागपूर चॅप्टरद्वारे शनिवारी पर्सिस्टंटच्या कवि कुलगुरू कालिदास सभागृहात ‘जम्मू काश्मीर आणि लद्दाखची परिवर्तनशील गतिशीलता, आव्हाने आणि संधी’ या विषयावर बन्सल यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी, त्यांनी जम्मू काश्मीर, लद्दाखचा इतिहास, पाकिस्तान आणि चीनसोबतची धोरणे, दोन्ही देशांसोबत असलेल्या सीमावादाची तफावत आणि हे प्रश्न निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरलेली राजकीय इच्छाशक्ती आदींवर दाखल्यानिशी विश्लेषणात्मक चिंतन सादर केले. व्यासपीठावर सेंटरच्या नागपूर चॅप्टरच्या अध्यक्ष मीरा खडक्कार व सचिव अभिनंदन पळसापुरे उपस्थित होते.ज्याप्रमाणे पाकिस्तान काश्मीरमधील फुटीरतावादी हुरियतच्या नेत्यांना विशेष आयोजनावर निमंत्रित करते आणि त्यांच्यात सांस्कृतिक नात्याचे बीज पेरते, तसे धोरण भारताने कधीच अवलंबिले नाही. पाकिस्तानला अपेक्षित सुन्नी इस्लाम आणि गिलगिट-बाल्टिस्तानचा मिश्रित इस्लाम अत्यंत वेगळा आहे. पाकिस्तानी संस्कृतीशी कोणत्याच अर्थाने त्यांची सरमिसळ होत नाही. उलट, त्यांची संस्कृती भारतीय हिंदू आणि लद्दाखशी निगडित आहे. संपूर्ण गिलगिट-बाल्टिस्तानी भारतधार्जिणे त्याच कारणामुळे आहेत आणि ते सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर बातम्यांतून दिसूनही येते. ते सांस्कृतिक आदानप्रदान करण्याच्या हेतूने आणि तेथील नेत्यांना भारताने कधीच आमंत्रित करून, त्यांना सहानुभूती दिली नाही. तेथील शिया कम्युनिटीला संरक्षणाचा आधार देऊन, त्यांच्या संस्कृतीचे व भाषांचे संवर्धन करण्याच्या हेतूने भारताने विविध उपक्रम राबविणे गरजेचे आहे.त्यांना तो आधार भारताकडूनच अपेक्षित आहे. त्यासाठी पाकिस्तानच्या रॅडिकल इस्लामिक आयडॉलॉजीला नामोहरम करण्यासाठी परस्परविरोधी रॅडिकल आयडॉलॉजी अंमलात आणून तेथील नागरिकांना आपलेसे करावे लागणार असल्याचे बन्सल यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन अंकिता देशकर यांनी केले. तर आभार सागर मिटकरी यांनी मानले.युद्ध अशक्यभारत आणि पाकिस्तान दोन्ही अण्वस्त्रधारी राष्ट्र आहेत. त्यामुळे, दोन्ही देशांमध्ये आता थेट युद्ध अशक्य आहे. मात्र, अशातही युद्ध झालेच तर त्यात चीन कधीच पडणार नाही. त्याची, कारणे वेगळी आहेत. चीन स्वत:च सीपीईसीमध्ये गुंतवणूक करून त्रस्त आहे. मात्र, भारत आणि चीनमध्ये युद्ध झालेच तर पाकिस्तान मात्र चीनकडून भारताविरोधात उभा होईल. तरी देखील, या सगळ्या निश्चित गोष्टी नसल्याचे आलोक बन्सल म्हणाले.शारदा पीठासाठी भारताने प्रयत्न करावेज्याप्रमाणे पाकिस्तानने करतारपूर मोकळे केले. त्याचप्रमाणे मिरपूर येथील शारदा पीठच्या दर्शनासाठी ते मोकळे करण्याचा विचार करत आहे. भारताने ही संधी साधणे गरजेचे आहे. त्यामुळे, गिलगीट-बाल्टिस्तानमधील नागरिकांशी संवाद साधने सोपे होणार असल्याचेही बन्सल म्हणाले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरladakhलडाखPakistanपाकिस्तान