शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

‘ट्रम्प टॅरिफ’मुळे भारत-अमेरिकेच्या ‘मिशन ५००’ चा मार्ग बिकट, घोषणेच्या दोनच महिन्यांत अडचण

By योगेश पांडे | Updated: April 4, 2025 05:55 IST

Trump Tariffs: सद्यस्थितीत जगभरात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’ची चर्चा सुरू असून विविध शेअर बाजारांना त्याचा फटका बसला आहे. मात्र या ‘टॅरिफ कार्ड’मुळे वाणिज्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांसमोरील आव्हाने वाढीस लागली आहेत.

- योगेश पांडे नागपूर  - सद्यस्थितीत जगभरात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’ची चर्चा सुरू असून विविध शेअर बाजारांना त्याचा फटका बसला आहे. मात्र या ‘टॅरिफ कार्ड’मुळे वाणिज्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांसमोरील आव्हाने वाढीस लागली आहेत. जर यातून मार्ग निघाला नाही तर दोनच महिन्यांअगोदर भारत व अमेरिकेने सोबत ठरविलेल्या ‘मिशन ५००’चा मार्ग बिकट होताना दिसत असून २०३० पर्यंत दोन्ही देशांतील व्यापार पाचशे बिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे स्वप्न अडचणीत येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व ट्रम्प यांच्या उपस्थितीत १२ व १३ फेब्रुवारी रोजी वॉशिंग्टन डी. सी. येथे वाणिज्य क्षेत्रातील तज्ज्ञ व अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. वस्तू आणि सेवा क्षेत्रातील द्विपक्षीय व्यापार मजबूत करण्यासाठी दोन्ही देशांकडून एकात्मिक दृष्टिकोन स्वीकारण्याचा संकल्प करण्यात आला होता. बाजारपेठेतील व्यापार वाढविणे, पुरवठा साखळी मजबूत करणे आणि शुल्कासंबंधींचे अडथळे कमी करण्यासाठी दोन्ही देशांत सखोल चर्चा झाली होती. पंतप्रधान व ट्रम्प यांनी द्विपक्षीय व्यापारासाठी ‘मिशन ५००’ची घोषणा केली. या माध्यमातून २०३० सालापर्यंत एकूण द्विपक्षीय व्यापाराची उलाढाल दुपटीहून अधिक वाढवत ५०० बिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. परस्पर फायदेशीर, बहु-क्षेत्रीय द्विपक्षीय व्यापार करार प्रस्थापित करण्याबाबत दोन्ही देशांमध्ये बैठकांचे सत्रदेखील सुरू होते. मात्र अवघ्या दोन महिन्यांतच डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे या ‘मिशन ५००’ समोर संकट उभे ठाकले आहे.

पाच वर्षांतील अमेरिकेशी ‘सरप्लस’ व्यापारमागील अनेक वर्षांपासून भारताचा अमेरिकेसोबत विविध क्षेत्रांत व्यापार सुरू आहे. पाच वर्षांतील आकडेवारीकडे लक्ष टाकले तर चीनपेक्षा अमेरिकेशी झालेला व्यापार भारताला फायदेशीर ठरला आहे. अमेरिकेसोबत ‘गुड्स ट्रेड’मध्ये भारताला फायदाच होत आला. २०१९-२० मध्ये हा आकडा १७.२६८ बिलियन डॉलर्स इतका होता. त्यानंतर त्यात वाढ होत गेली व २०२३-२४ चा भारताचा अमेरिकेशी ‘ट्रेड बॅलेन्स’ ३५.३१९ बिलियन डॉलर्स इतका होता. मात्र आता ‘ट्रम्प टॅरिफ’नंतर ही वाढ कायम ठेवण्याचे मोठे आव्हान केंद्र सरकारसमोर असेल.

अमेरिकेतून पाच वर्षांत झालेली आयातवर्ष : आयात मूल्य (बिलियन डॉलर्समध्ये)२०२० : २६.९०९२०२१ : ४१.३१६२०२२ : ५१.३०८२०२३ : ४४.४१०२०२४ : ४२.८२२

अमेरिकेत पाच सर्वाधिक निर्यात झालेल्या वस्तू (२०२४)कमोडिटी : निर्यात मूल्य (बिलियन डॉलर्समध्ये) : सरासरी शुल्कइलेक्ट्रिकल मशिनरी : १२.५७९ : १.२० टक्केमोती, ज्वेलरी : ९.२८७ : २.१० टक्केफार्मा उत्पादने : ८.८६३ : ०.२० टक्केन्यूक्लिअर रिॲक्टर्स, बॉयलर्स : ६.५६८ : १.३० टक्केखनिज इंधन, तेल : ४.४१६ : ०.५० टक्केटेक्सटाइल : ९.६ : -

टॅग्स :IndiaभारतUnited StatesअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पbusinessव्यवसाय