शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भारताकडे जगाला नवी दिशा देण्याची क्षमता : ज्ञानेश्वर मुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 21:45 IST

भारताइतकी विविधता जगात कुठेही नाही. भाषा, पंथ, धर्म अशा अनेक विविधता आहेत. मात्र तरी ते एकत्र सुखी समाधानाने राहतात. हीच खरी येथील नागरिकांची क्षमता आहे. यातून आपण जगाला एक चांगले मॉडेल देऊ शकतो. जगाला नवी दिशा देण्याची क्षमता भारताकडे आहे. परंतु ते करीत असताना भारतीय संविधान हे एकमेव मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त पराराष्ट्र सचिव व माजी राजदूत डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी येथे केले.

ठळक मुद्देभारतीय संविधान हेच मार्गदर्शक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारताइतकी विविधता जगात कुठेही नाही. भाषा, पंथ, धर्म अशा अनेक विविधता आहेत. मात्र तरी ते एकत्र सुखी समाधानाने राहतात. हीच खरी येथील नागरिकांची क्षमता आहे. यातून आपण जगाला एक चांगले मॉडेल देऊ शकतो. जगाला नवी दिशा देण्याची क्षमता भारताकडे आहे. परंतु ते करीत असताना भारतीय संविधान हे एकमेव मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त पराराष्ट्र सचिव व माजी राजदूत डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी येथे केले.विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल (वेद)तर्फे शनिवारी सायंकाळी प्रेस क्लब सिव्हील लाईन्स येथे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी वेदचे अध्यक्ष देवेंद्र पारेख व राहुल उपगन्लावार प्रामुख्याने उपस्थित होते. ‘भारताची मागील ३५ वर्षाची वाटचाल’हा व्याख्यानाचा विषय होता.डॉ. मुळे म्हणाले, स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही आपली ओळख जात हीच आहे. निवडणूक सुद्धा जातीच्या आधारावरच लढवली जात आहे. आपण संकुचित विचारात जगतो आहोत. यातून बाहेर पडण्याची गरज आहे. इतर देशांचा अभ्यास करायला हवा. आज आपण ग्लोबल झालो आहोत. सोशल मीडियामुळे जगातील कुठल्याही देशातील व्यक्तीसोबत आपण जुळलेलो आहोत. हीच खरी सुंदरता आहे. राजदूत हा भारताबाहेर राहून देशाचे रक्षण करणारा खऱ्या अर्थाने देशाचा सैनिकच आहे. यावेळी त्यांनी विविध देशांमध्ये काम करीत असताना कशा प्रकारे देशाची सेवा करता आली, याचे किस्से सांगितले.संचालन योगिता कस्तुरे यांनी केले. शिवकुमार राव यांनी आभार मानले.जगात कुठेही फसलेल्या भारतीयाला सुरक्षित बाहेर काढण्याची क्षमताडॉ. मुळे यांनी सांगितले की, एक वेळ अशी होती की जागतिक स्तरावर काही समस्या निर्माण झाल्यास अमेरिकेकडे मदतीसाठी पाहावे लागत होते. परंतु आता तशी परिस्थिती राहिली नाही. आज जगात कुठल्याही देशात फसलेल्या भारतीयास सुरक्षित बाहेर काढण्याची क्षमता आपल्या देशात आहे. यासाठी विदेशी मंत्रालयाशी संपर्क करावा. आतापर्यंत ४० देशात फसलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेले आहे. जगाला आपली शक्ती दाखवण्याची ही एक चांगली संधी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.‘पासपोर्ट’ ही एक संधीडॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना पासपोर्ट मॅन म्हणूनही ओळखले जाते. परराष्ट्र विभागात सचिव असताना त्यांनी आपल्या कार्यकाळात देशभरात ५१० पासपोर्टऑफिस सुरू केले. याबाबत बोलताना डॉ. मुळे म्हणाले पासपोर्ट हे केवळ एक दस्तावेज नसून ती एक संधी आहे. आजचा पासपोर्टधारक उद्या विदेशी पासपोर्ट धारकही होऊ शकतो. जगभरात विविध संधी आहेत.आपण त्याला नोकरी देऊ शकत नसू किंवा संधी देऊ शकत नसू आणि ती संधी त्याला विदेशात मिळत असेल तर त्याला जाऊ द्या, असेही ते म्हणाले.

टॅग्स :IndiaभारतMediaमाध्यमे