शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

स्वतंत्र विदर्भाशिवाय विकास अशक्यच!

By admin | Updated: July 21, 2014 22:26 IST

चंद्रकांत वानखडे यांचे मत : ‘रेल देखो, बस देखो’ अभिनव आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन

मंगरूळपीर : स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नावर अमरावती, नागपूर, चंद्रपुर व यवतमाळ येथे झालेल्या जनमत चाचणीतून वेगळ्या विदर्भाची जनभावना स्पष्ट झाली. हीच भावना आंदोलनाद्वारे प्रकट व्हावी या अनुषंगाने ९ ऑगस्ट रोजी संपूर्ण विदर्भात ह्यरेल देखो, बस देखो आंदोलनह्ण करण्यात येणार आहे. या आंदोलनात नागरिकांनी उत्स्फुर्त व्हावे, कारण स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्याशिवाय विकास नाही असे मत ज्येष्ठ नेते शेतकरी चळवळीचे अभ्यासक चन्द्रकांत वानखडे यांनी व्यक्त केले. ह्यजनमंच लढा विदर्भाचाह्ण या संघटनेद्वारे १८ जुलै रोजी कारंजा येथील महेश भवन व मंगरूळपीर येथील राष्ट्रीय विद्या निकेतनमध्ये पार पडलेल्या सभेमध्ये ते बोलत होते. ह्यरेल देखो, बस देखो आंदोलनह्ण आंदोलनाच्या प्रचारार्थ गडचिरोली जिल्ह्यापासून ते नागपुर जिल्ह्यापर्यंत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कार्यकर्त्यांच्या बैठका सुरु आहे. कारंजा व मंगरूळपीर येथे झालेल्या बैठकीला जनमंच समिती अध्यक्ष अँड. अनिल किलोर, प्रकाश इटनकर, जि.प.सदस्य गजानन अमदाबादकर, अंबादास डोईफोडे, महम्मद मुन्नीवाले, डॉ.दिवाकर इंगोले, जि.प.सदस्या बेबीताई चव्हाण, प्रा.शरद पाटील नागपूर, प्रमोद पांडे, मनोहर खोरगडे, डॉ.गजानन झाडे, प्रकाश इटनकर, राजीव जगताप आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना वानखडे म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये १९९७ ला भुवनेश्‍वरच्या पक्ष अधिवेशनात स्वंतत्र विदर्भ राज्याचा ठराव घेण्यात आला होता. आता तेच सरकार असल्याने वेगळ्या विदर्भाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. विदर्भातील आत्महत्येचा प्रश्न देशभरात गाजला त्याविषयी पि.साईनाथ यांनी लिखान केले. त्याची दखल घेत पंतप्रधान, कृषी मंत्री दौर्‍यावर आले होते. त्यावेळी १ हजार ७५ कोटीचे पॅकेज विदर्भाला दिले पण कापसाला दिला जाणारा बोनस रद्द केला असा अन्याय विदर्भावर नेहमीच होतो. दांडेकर समितीमध्ये १९९४ मध्ये अनुशेष २0१२ ला संपला त्यानंतर अनुशेष काढलाच नाही. २00६ मध्ये सत्यशोधन समिती आली होती. त्यांनी २२५ पानांचा अहवाल दिला. त्यामधील शेवटच्या पानाचा निष्कर्ष असा होता की, विदर्भाचा विकास होणे शक्य नाही. विदर्भाला निधी दिला जात नाही दिला तर खर्च करता येत नाही असा तो निधी असतो. विदर्भाचा विकास साधण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्याशिवाय विकास नाही. त्यामुळे ९ ऑगस्ट क्रांतीदिनी स्वतंत्र विदर्भ राज्य निमिर्तीसाठी ह्यरेल देखो बस देखो आंदोलनह्ण करण्यात येत आहे. या प्रसंगी गजानन अमदाबादकर, डॉ निलेश हेडा, पवन मिश्रा, राजाभाऊ चव्हाण, शेषराव ढोके, ओमप्रकाश तापडीया, बंडूभाऊ इंगोले व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. तसेच आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन प्रकाश इटनकर, प्रमोद पांडे, किशोर गुर्‍हाने, राम आखरे, टी.बी.जगताप, श्रीकांत दोड, भगवानदास राठी, हसमुखभाई पटेल, विनोद बोरकुटे यांनी केले आहे. ९ ऑगस्ट रोजी मंगरूळपीर येथे होणार्‍या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते सुभाष हातोलकर यांच्याकडे सोपविण्यात आली. सभेला सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई हातोलकर, प्रा.अरूणभाऊ इंगळे, केंद्रप्रमुख अरूणभाऊ पंडित, सतिश बन्नोरे, मृण्मयी हातोलकर, शकातुल्लाखाँ, डॉ.विकल पंडित, प्राचार्य मनोहर बनसोड, राजेन्द्र बोरकर, प्रा.देविदास भगत, आकाश शेळके, ऋषिकेश गडकर उपस्थित होते. सूत्रसंचालन सुभाष हातोलकर व अनिल लोहकपुरे यांनी केले. आभार पवन मिश्रा यांनी मानले.